हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो उद्घाटनाशिवाय तातडीने सुरू करा; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
या पार्श्वभूमीवर, “नागरिकांचे हाल थांबवण्यासाठी उद्घाटनाची औपचारिकता न पाळता ही मेट्रो तातडीने प्रवाशांच्या सेवेत सुरू करा; नंतर पंतप्रधानांची वेळ मिळाल्यास मोठा सोहळा आयोजित करा,” असा सल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते.
Asian Para Games: भारताची मान अभिमानाने उंचावली! Simran ने रचला ‘हा’ इतिहास, होणार जंगी स्वागत
गेल्या महिन्यातील चाकण आणि हिंजवडी दौऱ्याचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, “येथील खराब रस्ते आणि पाण्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक घेऊन पॅकेज जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर कोणताच फरक पडलेला नाही. शासकीय यंत्रणांमध्ये समन्वयासाठी नेमलेली समिती आचारसंहितेचे कारण पुढे करत निष्क्रिय बसली आहे. त्यामुळे आयटी हबमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.”
हिंजवडी आयटी पार्कच्या विदारक स्थितीवर बोट ठेवत ते म्हणाले, “हे राज्यभरातील एक महत्त्वाचे उद्योग केंद्र आहे. येथे जगप्रसिद्ध ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांची कार्यालये आहेत. मात्र, या कंपन्यांच्या गेटबाहेर पाऊल ठेवताच खड्डे, प्रचंड वाहतूक कोंडी आणि गैरसोयींचे भीषण वास्तव समोर येते. नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारकडून कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत.”
Highway Accident News: प्रशासकीय निष्काळजीपणा नडला! अर्धा तास रुग्णवाहिका गायब
परिसरातील पाणीटंचाई आणि दूषित पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरताना ठाकरे म्हणाले, “आयटी पार्क परिसरातील नागरिकांना सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. स्थानिक शासकीय यंत्रणा नवीन बांधकामांना मंजुरी देताना पाणीपुरवठ्याची जबाबदारी झटकत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासनाने आता जबाबदारी टाळणे थांबवून येथील रहिवाशांना तातडीने पुरेसे आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे.”






