Pradeep Purnekar Murder case; मुळशीत कट रचला, मुख्य आरोपीसोबत बंदूक चालवतानाचा व्हिडिओ, पूर्णेकर हत्या प्रकरण तापणार
यासर्व घडामोडींनंतर राम पूर्णेकर यांनी मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्याशी संबंधित दोन व्हिडिओ जारी करत एकच खळबळ उडवून दिली आहे. पूर्णेकरांनी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये आरोपी निखील यादव बंदूक चालवताना दिसतो, तर त्याच्या बाजूल राजेंद्र शिगे हेदेखील उभे असल्याचे दिसून येत आहे. व्हायरल व्हिडीओ मुळशीतील असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्हिडीओ विशेष तपास पथकाच्या हातील लागला आहे. पोलिसांनी या व्हिडीओप्रकरणी मुळशीमध्ये जाऊन चौकशी केली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात हा मोठा दुवा असल्याची चर्चा आहे. या प्रकरणात पोलिसांनी राजेंद्र शिंगे यांची शुक्रवारी सातव्यांदा चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले.
World Polio Day 2026: आज जागतिक पोलिओ दिन; जाणून घ्या २४ ऑक्टोबरचा इतिहास..
पूर्णेकरांच्या हत्येसाठी आरोपींनी मुंबईतील चोर बाजारातून २०० ते ३०० रूपयांना हत्यारे खरेदी केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. हे हत्या अद्याप जप्त करण्यात आलेले नाही. याशिवाय, या प्रकरणी आरोपी संतोष कनोजिया आणि अमित सिंग या दोघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस या हत्याप्रकरणात अधिक खोलात जाऊन चौकशी करत आहेत.
पूर्णेकरांच्या हत्येसाठी आरोपींनी मुंबईतील चोर बाजारातून २०० ते ३०० रूपयांना हत्यारे खरेदी केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. हे हत्या अद्याप जप्त करण्यात आलेले नाही. याशिवाय, या प्रकरणी आरोपी संतोष कनोजिया आणि अमित सिंग या दोघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस या हत्याप्रकरणात अधिक खोलात जाऊन चौकशी करत आहेत.
पूर्णेकर हत्येप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून तपासादरम्यान, मोबाईल, दोन पिस्तूल, दोन चॉपर, चार वाहने आणि दुचाकी हस्तगत केली आहे. यासोबतच आरोपींनी गोळीबार करण्यासाठी उत्तर प्रदेशातून प्रत्येकी १५ हजार रुपयांची देशी पिस्तुल खरेदी केली होती. तर मुंबईच्या चोर बाजारातून चॉपर खरेदी केले होते. याशिवा राम पूर्णेकरांनी दाखविलेल्या दोन व्हिडिओंच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने राजेंद्र शिंदे यांची चौकशी केली आहे.
Ans: या प्रकरणात मुख्य आरोपी पप्या शिंदे याच्यासह एकूण ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Ans: प्रकरणातील आरोपी निखील यादव मुळशी येथे बंदूक चालवताना दिसत आहे आणि त्याच्या शेजारी राजेंद्र शिंदे उभे असल्याचे दर्शवणारा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे.
Ans: हत्या प्रकरणात हत्येचा कट रचल्याच्या आरोपांवरून एसआयटीने राजेंद्र शिंदे यांची आतापर्यंत तब्बल सात वेळा चौकशी केली आहे.






