Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijit Dipke CJP Protest: दिल्लीत तरुणांचा जनसागर; संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त!

Abhijit Dipke CJP Protest: कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन आज सकाळी 10.30 वाजता सुरू झाले तर दुपारी 3.30 वाजता आंदोलनाची सांगता करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण जंतर-मंतर परिसर रिकामा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी आंदोलनस्थळी भेट देत सुमारे 30 मिनिटे उपस्थितांना संबोधित केले.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 06, 2026 | 07:07 PM
Abhijit Dipke, CJP, Jantar Mantar Protest, NEET Scam, Dharmendra Pradhan,

Abhijit Dipke, CJP, Jantar Mantar Protest, NEET Scam, Dharmendra Pradhan,

Follow Us
Follow Us:
  • अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत जोरदार आंदोलन
  • धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
  • अभिजीत दिपकेंच्या संभाजीनगर येथील  निवासस्थानी  पोलिसांचा मोठा फौजफाटाही
Abhijit Dipke Sambhajinagar : गेल्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके आज (6 जून) भारतात परतले. अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत जोरदार आंदोलन केले. जंतरमंतरवर तरुणांचा जणूकाही जनसागर लोटला होता. जंतरमंतरवरील आंदोलनात नीट पेपरफुटी घोटाळ्यावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत अभिजीत दीपकेंसह त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं.

एकीकडे दिल्लीत सीजेपी’च्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय मात्र चांगलेच चिंतेत होते. त्यातच अभिजीत दिपकेंनी कॉकरोच जनता पार्टीची चळवळ सुरु केल्यापासून त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संभाजीनगरच्या वाळूज येथील त्यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Cockroach Janta Party : ‘कॉकरोच घाबरतही नाहीत…’ जंतर-मंतरवर अभिजीत दीपके यांची हुंकार, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

अभिजीत दिपके हे आज सकाळी अमेरिकेतून दिल्लीमध्ये दाखल झाले. एकीकडे जंतरमंतर मैदानात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा पोलीस प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.

कॉकरोच जनता पार्टीचे जंतर-मंतर आंदोलन संपले

कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन आज सकाळी 10.30 वाजता सुरू झाले तर दुपारी 3.30 वाजता आंदोलनाची सांगता करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण जंतर-मंतर परिसर रिकामा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी आंदोलनस्थळी भेट देत सुमारे 30 मिनिटे उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी भाषण करत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसे न झाल्यास पुढील आठवड्यात देशभरातील इतर शहरांमध्येही आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे.

Cockroach Janata Party Protest: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांची परवानगी

आंदोलकांना कॉकरोच म्हणून हिणवणे योग्य नाही – उद्धव ठाकरे

“दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोचचे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉकरोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. NEET पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कॉकरोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे!, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Abhijit dipke sambhajinagar house police security cockroach janta party delhi protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party

संबंधित बातम्या

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली
1

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल
2

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका
3

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.