‘कॉकरोच घाबरतही नाहीत...’ जंतर-मंतरवर अभिजीत दीपके यांची हुंकार, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Cockroach Janta Party Abhijeet Dipke News Marathi : सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (Cockroach Janta Party) जंतरमंतरवरील प्रस्तावित आंदोलनाला (Protest) दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अधिकृत परवानगी दिली आहे . या परवानगीनंतर कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) सदस्यांनी शनिवारी (6 जून 2026) जंतर मंतर येथे आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलकांची मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील महत्त्वाच्या ठिकाणी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. यापूर्वी, सीजेपीने जंतर मंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी मिळाल्याचे जाहीर केले होते.
सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामुळे मध्य दिल्ली, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळ, प्रमुख रेल्वे स्थानके, आंतरराज्यीय बस टर्मिनल्स आणि दिल्लीला शेजारील राज्यांशी जोडणाऱ्या सीमा प्रवेशद्वारांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
सोशल मीडियावरील पोस्ट काढल्या जाऊ शकतात, पण आम्हाला संपवता येणार नाही.
गेल्या महिनाभरापासून आम्ही शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत.
कारवाई करण्याऐवजी, सरकार खाती हॅक करण्यात आणि पोस्ट हटवण्यात व्यस्त आहे.
हा लढा दीर्घकाळ चालणारा आहे आणि आम्ही मागे हटणार नाही.
देशातील विद्यार्थी आणि तरुण विकले गेलेले नाहीत.
या आंदोलनासाठी मी माझ्या स्वातंत्र्याचा त्याग करायलाही तयार होतो.
हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध असेल.
धर्मेंद्र प्रधान इस्तीफ़ा दो! शिक्षा मंत्री को हमने चुन कर भेजा है, हमारे टैक्स से उनको तनख्वाह मिलती है! उनके शासन काल में करोड़ों युवाओं का भविष्य अंधकार में है। cockroach आ रहे हैं, धर्मेंद्र प्रधान जा रहे हैं! #cjpprotest pic.twitter.com/LYcOUY7Shc — Cockroach is Back (@Cockroachisback) June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांवर आणि कथित प्रशासकीय त्रुटींवरून हे आंदोलन उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
यावेळी दीपके यांनी भाषण करत सरकार आणि शिक्षण व्यवस्थेवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचा आरोप करत त्यांनी “धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,” अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली तसेच शिक्षण क्षेत्रातील निर्णयांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी शिक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. परीक्षापद्धती, शैक्षणिक धोरणे आणि विद्यार्थ्यांवरील परिणाम यासंदर्भात केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. जंतर-मंतरवरील या आंदोलनामुळे राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या मागणीवर केंद्र सरकार किंवा शिक्षण मंत्रालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी असून, आंदोलन पुढे अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






