
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:
नीट पेपरलीक प्रकरणारून कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलकांनी संसद भवनावर मोर्चा नेला होता. विद्यार्थ्यांचा मोर्चा संसदेच्या दारात पोहचल्यावर सुरक्षा दलाकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणी प्रकरणी सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी या विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे. काल जे झाले त्यासाठी मी तुमची माफी मागतो. असं अभिजीत यांनी विद्यार्थ्यांना म्हटलं आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी सोमवारी (20 जुलै) दिल्लीतील संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. शनिवारी (19 जुलै) शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेल्यानंतर सीजेपीच्या आंदोलकांनी थेट संसदेवर हा मोर्चा नेला होता. या वेळी पोलिसांनी केलेल्य लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी आंदोलक गंभीर जखमी झाले. त्यामुळे आता सीजेपीची पुढची वाटचाल कशी असणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
21 Jul 2026 06:17 PM (IST)
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.
21 Jul 2026 06:13 PM (IST)
Congress Delhi Parliament March: राजधानी दिल्लीत सोमवारी (20 जुलै) संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिवसभर तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. संसद भवन आणि जंतर-मंतर परिसरातील रस्त्यांवर आंदोलकांची मोठी गर्दी उसळली होती. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की व संघर्ष झाल्याची घटना घडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. शेकडो विद्यार्थी आंदोलक गंभीर जखमी झाले. यानंतरही सीजेपीने आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.
21 Jul 2026 06:03 PM (IST)
मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात ‘नीट’ (NEET) पेपरफुटीप्रकरणी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद आता महाराष्ट्रात तीव्रतेने उमटू लागले आहेत. या दडपशाहीचा आणि अमानुष पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) येत्या २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे ही घोषणा करत राज्यातील सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना पाठिंब्याचे आवाहन केले आहे.
21 Jul 2026 05:30 PM (IST)
इस्रायल आणि इराण-समर्थित हिजबुल्लाह दहशतवादी गट यांच्यातील महिनोंच्या युद्धानंतर युद्धग्रस्त देशात दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. वॉशिंग्टनचा हा त्यांचा चार दिवसांचा दौरा आहे.जोसेफ औन यांची ट्रम्प यांच्यासोबतची ही ऐतिहासिक भेट अशा वेळी होत आहे जेव्हा लेबनॉन आणि इस्रायल वॉशिंग्टनच्या मध्यस्थीने दुर्मिळ थेट चर्चा करत आहेत. दक्षिण लेबनॉनमध्ये सध्या इस्रायली सैन्याने व्यापलेल्या मोठ्या भागातून इस्रायली सैन्याने माघार घ्यावी आणि ज्या भागात हिजबुल्लाह दहशतवाद्यांचे वर्चस्व होते त्या भागांवर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी लेबनॉनच्या सैन्याला पाठिंबा मिळावा, अशी लेबनॉनची आशा आहे.लेबनॉन आणि इस्रायलने 26 जून रोजी “फ्रेमवर्क कराराची” घोषणा केली होती. या करारानुसार दक्षिण लेबनॉनमधून इस्रायली सैन्याने माघार घेणे आणि दशकांपासून या भागात मजबूत उपस्थिती असलेल्या हिजबुल्लाहचे निःशस्त्रीकरण करणे याचा आराखडा ठरला आहे. यात दोन्ही देशांमधील अंतिम शांतता कराराच्या दिशेने टप्पे देखील आहेत. इस्रायलची स्थापना झाल्यापासून जवळपास 80 वर्षांपासून या दोन्ही देशांमध्ये औपचारिक राजनैतिक संबंध नाहीत आणि ते नाममात्र युद्धस्थितीत आहेत.अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले की “पायलट झोन”चा भाग मानल्या जाणाऱ्या तीन गावांमध्ये कामकाज सुरू झाले आहे, मात्र त्याचे तपशील दिले नाहीत. फ्रौन, स्रिफा आणि झावतार अल-गर्बीह ही तीन गावे इस्रायली लष्करी नियंत्रणाखाली नाहीत. या घोषणेनंतर लेबनॉन किंवा इस्रायलच्या लष्कराने किंवा राजकीय नेतृत्वाने तातडीने कोणतेही निवेदन जारी केले नाही .
21 Jul 2026 05:10 PM (IST)
India Vs ZImbabwe T20 Series: भारत अन् इंग्लंड यांच्यातील सिरिज संपल्यावर आता लवकरच भारत अन् झिम्बाब्वे यांच्यात तीन टी 20 सामन्यांची सिरिज खेळवली जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रेयस अय्यर कर्णधार असणार आहे. तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला देखील स्थान देण्यात आली आहे. दरम्यान झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.
21 Jul 2026 05:01 PM (IST)
भारतातील कुटुंबांच्या बदलत्या आकांक्षांनुसार सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणत किया कॅरेन्सने किया इंडियाच्या उत्पादन श्रेणीमध्ये महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. किया ग्राहकांच्या अभिप्रायाशी नेहमीच जोडलेली राहिली आहे. कंपनीने सुरक्षा, तंत्रज्ञान, आराम, सोय आणि डिझाइनमधील अर्थपूर्ण प्रगतीच्या माध्यमातून ग्राहकांचा मालकीहक्क अनुभव सातत्याने सुधारण्यासाठी वास्तविक अनुभवांचा लाभ घेतला आहे. ग्राहकांना प्रथम प्राधान्य देण्याच्या या विचारसरणीमुळे कॅरेन्स आपल्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वपूर्ण ठरली आहे, तसेच, कौटुंबिक गतीशीलता क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.
21 Jul 2026 04:37 PM (IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ धरणे आंदोलन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे देखील या आंदोलनात सामील झाले आहेत. यापूर्वी, काँग्रेस नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानापासून पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला होता. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिले, “काल तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराबद्दल उत्तरे मागण्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला आहे. सरकारला ना जबाबदारी घ्यायची आहे, ना संसदेत यावर चर्चा करायची आहे. भारताच्या तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा.” वाचा सविस्तर...
21 Jul 2026 04:27 PM (IST)
मध्य प्रदेश विधानसभेत मोठ्या गदारोळात समान नागरी संहिता (UCC) विधेयक मंजूर करण्यात आले. उत्तराखंड, गुजरात आणि आसामनंतर, मध्य प्रदेश हे समान नागरी संहिता लागू करणारे चौथे राज्य ठरेल. या विधेयकात लिव्ह-इन रिलेशनशिप आणि विवाहासंदर्भात अनेक महत्त्वाच्या तरतुदी प्रस्तावित आहेत. एकदा हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यावर, मध्य प्रदेशात लिव्ह-इन रिलेशनशिपची नोंदणी अनिवार्य होईल. वाचा सविस्तर...
21 Jul 2026 04:17 PM (IST)
दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात भरती करणे आणि आंदोलकांवर बेफाम लाठीचार्ज करणे, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झाले असून त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे,” असा संतप्त टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. वाचा सविस्तर...
21 Jul 2026 04:09 PM (IST)
राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP (कॉकरोच जनता पार्टी)च्या आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी आंदोलनाचे प्रमुख चेहरा बनलेले अभिजित दिपकेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राऊत यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. वाचा सविस्तर...
21 Jul 2026 04:00 PM (IST)
India Vs Sri Lanka Test Series: इंग्लंड दौरा संपून भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्ध टी 20 सिरिज खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर भारतीय कसोटी संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हिस्सा असणार आहे. त्यामुळे ही सिरिज महत्वाची असणार आहे. मात्र या सिरिजमध्ये बुमराह खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीसीसीआय लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
21 Jul 2026 03:55 PM (IST)
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन हे नौटंकी आहे. सरकारला बदनाम करण्याकरता हे आंदोलन केलं जात आहे. अशा शब्दांत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी सीजेपीने संसद भवनावर मोर्चा आयोजित केला. दुपारच्या सुमारास हा मोर्चा संसदभवनाच्या परिसरात दाखल झाला. त्यावेळी दिल्ली पोलिसांसह सुरक्षा दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांवर बेछुट लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर
21 Jul 2026 03:50 PM (IST)
चालू खरीप हंगामात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी हवामानाच्या लहरीपणाशी सामना करत पेरण्यांचा वेग कायम ठेवला आहे. कृषी विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ७९.३८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ७,१६,२०९ हेक्टर असून, त्यापैकी ५,६८,५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीची कामे मार्गी लागली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दिलेली ओढ आणि उघाडीमुळे पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली असून, शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. पावसाचा हा खंड असाच लांबल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर
21 Jul 2026 03:45 PM (IST)
Union Bank Recruitment 2026 notification: बँकिंग क्षेत्रात अधिकारी बनण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India) नवीन भरती जाहीर केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने ‘भरती प्रकल्प २०२६-२७’ अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर, जनरल बँकिंग ऑफिसर आणि डोमेन एक्सपर्ट ऑफिसर यांसारख्या विविध एकूण ३९५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २१ जुलैपासून सुरू झाली असून उमेदवार १० ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती कायमस्वरूपी आधारावर केली जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग बँकेच्या गरजेनुसार देशभरात कुठेही केली जाईल. वाचा सविस्तर
21 Jul 2026 03:40 PM (IST)
बारामती : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील घरपोच पोषण आहार योजनेत महत्त्वाचे बदल केले असून, नोव्हेंबर व डिसेंबर २०२६ पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा केला जाणार आहे. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अधिक पौष्टिक, रुचकर व दर्जेदार आहार मिळावा, यासाठी शाकाहारी (व्हेज) पुलाव, बहुधान्य पौष्टिक पफ यांचा समावेश करण्यात आला असून खिचडीसोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीटही देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली आहे. वाचा सविस्तर
21 Jul 2026 03:35 PM (IST)
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा साठा आधीच खूप कमी पातळीवर आहे आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यामुळे पुरवठा सतत प्रभावित होत आहे.सीएनबीसीच्या विश्लेषकांनी इशारा दिला आहे .जर जहाजांची नाकेबंदी जास्त काळ चालू राहिली आणि जगभरात तेलाचा साठा कमी राहिला, तर कच्च्या तेलाच्या किंमती लवकरच 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर जातील. वाचा सविस्तर
21 Jul 2026 03:30 PM (IST)
पुणे : सामान्य पुणेकरांकडून मिळकतकर आणि पाणीपट्टीची दमडी-दमडी वसूल करण्यासाठी जप्तीसारखी कठोर कारवाई करणाऱ्या पुणे महापालिकेला स्वत:च्या मालमत्तांचे भाडे वसूल करण्यात मात्र अपयश आल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या मालकीच्या सदनिका, इमारती आणि मोकळ्या जागांच्या भाड्यापोटी तब्बल ३५ कोटी ४४ लाख २८ हजार ६१० रुपये थकित असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या अधिकृत उत्तरातून उघड झाली आहे. वाचा सविस्तर
21 Jul 2026 03:25 PM (IST)
युनायटेड किंगडमच्या 'युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स'ने (UKMTO) दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिराती(UAE)च्या फुजैराह बंदराजवळ एका जहाजावर हल्ला झाला आहे. UKMTO च्या माहितीनुसार, दिब्बाच्या पूर्वेस १७ नॉटिकल मैल अंतरावर एका अज्ञात शस्त्राने जहाजाला लक्ष्य करण्यात आले. यामुळे जहाजाची स्टिअरिंग यंत्रणा निकामी झाली. अल जझीराच्या वृत्तानुसार, जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.
21 Jul 2026 03:25 PM (IST)
APAAR ID Supreme Court Verdict: देशभरातील करोडो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संबंधित APAAR ID (अपार आयडी) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, ओडिशा उच्च न्यायालयाचा निर्णय देशभरात लागू करण्याचे निर्देश ते ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला’ देतील. या निर्णयामुळे आता APAAR ID साठी पालकांकडून संमती घेण्याच्या अर्जामध्ये बदल होईल. पालकांना आपल्या मुलाचा APAAR ID काढायचा आहे की नाही, हा स्पष्ट पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आता मिळणार आहे. हा मुद्दा केवळ एका स्टुडंट आयडीपुरता मर्यादित नसून शिक्षणाचा अधिकार, वैयक्तिक गोपनीयता, आधार आणि मुलांच्या डिजिटल डेटाच्या सुरक्षेशी जोडलेला आहे. वाचा सविस्तर
21 Jul 2026 03:20 PM (IST)
अमेरिकेच्या 'सेंट्रल कमांड'ने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, २० जुलैपर्यंत अमेरिकन लष्कराने सात जहाजांना इराणी बंदरांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले आहे. एका जहाजाला नष्ट करण्यात आल्याचा दावा केला आहे.
U.S. service members aboard amphibious assault ship USS Boxer (LHD 4) support flight operations day and night from the Arabian Sea as CENTCOM enforces the naval blockade against Iran. As of July 20, the U.S. military has redirected 7 commercial vessels and disabled 1 to prevent… pic.twitter.com/a1gtwipPUf
— U.S. Central Command (@CENTCOM) July 20, 2026
21 Jul 2026 03:15 PM (IST)
सोमवारी (२० जुलै) झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांची केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी भेट घेतली आहे. त्यांनी दिल्लीतील 'लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज'ला भेट दिली. रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी रुग्णांची प्रकृती आणि आरोग्याविषयी विचारपूस केली. आंदोलनादरम्यान झालेल्या संघर्षामध्ये अनेक जण जखमी झाले होते आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते.
#WATCH दिल्ली: केंद्रीय मंत्री जेपी नड्डा कल हुए विरोध प्रदर्शन में घायल हुए लोगों से मिलने लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज पहुंचे। pic.twitter.com/YcwcihYtto
— ANI_HindiNews (@AHindinews) July 21, 2026
21 Jul 2026 03:15 PM (IST)
पुणे : सोमवारी पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी मनसेने केलेल्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थसंदर्भात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. तर आयुक्त नवल किशोर राम यांनी सुरक्षा रक्षकांच्या भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाचा सविस्तर
21 Jul 2026 03:10 PM (IST)
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी विद्यार्थ्यांची आंदोलने, उपोषणे, लाठीमार आणि हिंसाचार यांबाबत संसदेत चर्चा करण्याची मागणी केली आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय करणे ही संसदेची मूलभूत भूमिका आहे आणि अशा विषयांवर सभागृहात चर्चा झाली नाही, तर मग कोठे होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सरकारच्या भूमिकेवर टीका करत, त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी खुल्या चर्चेची संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन लोकसभा अध्यक्षांना केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांना अशा प्रकारची वागणूक दिली जाऊ नये, यावर त्यांनी भर दिला. तसेच, थरूर यांनी जबाबदारी निश्चित करण्याची आणि त्वरित कारवाई करण्याची मागणीही केली.
#WATCH दिल्ली: कांग्रेस सांसद शशि थरूर ने कहा, "यह वाकई बहुत दुखद स्थिति है। संसद का काम ही चर्चा करना है। हमारे सामने कई ऐसे मुद्दे हैं जो देश और इस राजधानी शहर में बहुत अहम हैं। हमने देखा कि कल क्या हुआ और ऐसे हालात में अगर संसद इन पर चर्चा करने की जगह नहीं है, तो फिर कौन सी… pic.twitter.com/Rb6x1Gh3jM
— ANI_HindiNews (@AHindinews) July 21, 2026
21 Jul 2026 03:05 PM (IST)
टेक जायंट कंपनी असलेल्या ॲपलची नेक्स्ट जेनरेशन फ्लॅगशिप आयफोन 18 प्रो सिरीज यावर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाणार आहे. कंपनी सप्टेंबर महिन्यात या सिरीजमधील आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स असे दोन मॉडेल्स लाँच करू शकते. पण आगामी आयफोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे डिटेल्स आणि किंमती समोर आल्या आहेत. कंपनीने अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच अमेरिकेत आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्सची किंमत लीक झाली आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्सच्या किंमतीच्या तुलनेत कंपनीच्या आगामी आयफोन सिरीजच्या किंमती जास्त असणार आहेत. वाचा सविस्तर
21 Jul 2026 03:00 PM (IST)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP (कॉकरोच जनता पार्टी)च्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “पोलिसांनी केलेला लाठीचार्ज परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक होता. वेळीच हस्तक्षेप झाला नसता, तर अधिक गंभीर घटना घडल्या असत्या,” असे त्यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर
21 Jul 2026 02:55 PM (IST)
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या सुरक्षिततेबाबत आणि आरोग्याबाबत मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ही सुनावणी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आधारित होती. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची (Central Goverment) बाजू मांडली. सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही. वाचा सविस्तर
21 Jul 2026 02:50 PM (IST)
अफगाणिस्तानवर पुन्हा मोठे संकट कोसळले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने याची पुष्टी केली. सध्या बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे.
21 Jul 2026 02:45 PM (IST)
येत्या 23 जुलैपासून भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात तीन टी 20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करताना दिसणार आहे. भारतीय संघात अनेक बदल दिसणार आहेत. श्रेयस अय्यर समोर कर्णधार म्हणून आपला पहिला सामना जिंकण्याचे आव्हान असणार आहे. 23 जुलै रोजी हा पहिला टी 20 सामना किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहू शकणार याबाबत जाणून घेऊयात.
21 Jul 2026 02:30 PM (IST)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘सीजेपी’चा (CJP) संसदेकडे निघालेला मोर्चा, आंदोलकांवरील पोलिसांचा लाठीचार्ज आणि ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावर निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले की, काल संसद भवनाजवळ घडलेल्या घटनांबद्दल पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने विद्यार्थ्यांची माफी मागितलेली नाही. देशातील तरुण एका भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेविरुद्ध आंदोलन करत आहेत; शिक्षण व्यवस्था ही वाळवी लागलेल्या लाकडाप्रमाणे आतून पोखरली गेली आहे, याची संपूर्ण देशाला जाणीव आहे. पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. मी जखमी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आरएलएम (RLM) रुग्णालयात जाणार आहे.
21 Jul 2026 02:25 PM (IST)
मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत फोनवर बोलण्याच्या संशयातून आणि कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्याच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताबयात आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना ओशिवऱ्यातील गुलशननगर येथील रोस्वाल्ट बिल्डिंगमध्ये सोमवारी रात्री घडली.
21 Jul 2026 02:10 PM (IST)
शहरातील आणि जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये व्यावसायिक आस्थापनांकडून मालावर कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी) जास्त दर आकारल्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. या मनमानी दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. अन्न आस्थापनांमध्ये नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) नियमित कारवाईनंतर, दुकानांमध्ये होणाऱ्या उघड उल्लंघनाच्या वाढत्या तक्रारींनंतर वजन आणि मापन विभागानेही कठोर भूमिका घेत पूर्णपणे सक्रियता दाखवली आहे. याचा परिणाम बाजारपेठेत जाणवू लागला आहे.
21 Jul 2026 02:05 PM (IST)
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सध्या आपल्या आंदोलनामुळे आणि आमरण उपोषणामुळे चर्चेत आहेत. दरम्यान, आता त्यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो देखील नागरिकांच्या चर्चेत आल्या आहेत. सोनम वांगचुक सध्या रुग्णालयात उपचार घेत असताना, त्यांच्या पत्नी केवळ त्यांच्या आंदोलनाचा आवाज बुलंद करत नाहीत, तर कायदेशीर लढ्यापासून ते जनसमर्थन मिळवण्यापर्यंत प्रत्येक आघाडीवर सक्रिय दिसत आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण जाणून घेणार आहोत की, गीतांजली जे. अंगमो नेमक्या कोण आहेत आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे.
21 Jul 2026 02:00 PM (IST)
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त ‘कानडा राजा पंढरीचा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता रंगशारदा, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे हा कार्यक्रम सादर होणार आहे. कानडा राजा पंढरीचा’ हा महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक वारशाचा सुरेल आविष्कार आहे. विठ्ठलभक्ती, संतपरंपरा आणि अभंगसंगीत यांच्या माध्यमातून रसिकांना भक्तिरसपूर्ण सांगीतिक अनुभव देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे.
21 Jul 2026 01:55 PM (IST)
पुणे येथून एक हत्येची घटना समोर आली आहे. जुन्या कात्रज बोगद्याजवळ झालेल्या खूनप्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. हा खून कोणत्याही वैयक्तिक वादातून नव्हे, तर तब्बल दोन वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचल्याचे तपासात समोर आले आहे. 23 वर्षीय तरुणाने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी चौघांना अटक करत देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
21 Jul 2026 01:45 PM (IST)
बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट ‘3 इडियट्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर आणि बोमन इराणी यांच्या दमदार अभिनयाने गाजलेला हा चित्रपट तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
21 Jul 2026 01:35 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक निर्णय घेतला आहे. त्यांनी कॅनडातून आयात होणाऱ्या बहुतांश वस्तूंवर ५०% टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिका आणि कॅनडातील व्यापार तणाव पुन्हा वाढू शकतो. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेतही खळबळ उडण्याची शक्यता आहे.
21 Jul 2026 01:25 PM (IST)
भारतातील आयटी क्षेत्रात अनेक मोठी नावे आहेत, पण सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सी. विजयकुमार. त्यांच्या कामगिरीपेक्षा यावेळी त्यांच्या मानधनाची चर्चा अधिक रंगली आहे. एका भारतीय आयटी कंपनीच्या प्रमुखाला तब्बल शेकडो कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाल्याने उद्योगविश्वासह सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, हा प्रवास एका दिवसात घडलेला नाही. अनेक वर्षांची मेहनत, सातत्य आणि योग्य निर्णय यामुळे त्यांनी हे स्थान मिळवले आहे.
21 Jul 2026 01:20 PM (IST)
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एनडीए खासदारांच्या ‘मंगल मिलन’ बैठकीनंतर, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनीही या बैठकीत पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी बैठकीदरम्यान हे स्पष्ट केले की, नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही आणि त्यांना कठोरतम शिक्षा दिली जाईल. पंतप्रधान मोदींनी असेही सांगितले की, पेपरफुटी रोखणे ही केवळ केंद्र सरकारची जबाबदारी नाही, तर याचा मुकाबला करण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.
21 Jul 2026 01:15 PM (IST)
सोमवारी राजधानी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पक्षाच्या संसद मोर्चादरम्यान मोठा गोंधळ उडाला. या हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी दंगलखोरांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. हत्येचा प्रयत्न आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी वेगवेगळ्या घटनांच्या आधारे अनेक एफआयआर दाखल करून आपला तपास तीव्र केला आहे.
21 Jul 2026 01:06 PM (IST)
अयोध्येतील राम मंदिर दानचोरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने सरकारला नव्याने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, तपासाला योग्य आणि ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी या नवीन तपास पथकाचे नेतृत्व एखाद्या वरिष्ठ व तज्ज्ञ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात यावे.
21 Jul 2026 12:57 PM (IST)
दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच लाठीहल्याच्या निषेधार्थ खोपोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ महाविकास आघाडी आणि नागरिक विद्यार्थी यांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन करीत पाठिंबा दिला. भर पावसात आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.
21 Jul 2026 12:48 PM (IST)
जिल्ह्यातील नगर-मनमाड महामार्गावर धामोरी फाटा परिसरातील हरी ओम कृषी सेवा केंद्राला भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण कृषी सेवा केंद्र आगीच्या विळख्यात सापडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणात खत, बियाणे आणि इतर कृषी साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसानाचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
21 Jul 2026 12:36 PM (IST)
चालू खरीप हंगामात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 79% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर आणि मका या पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे मुगाच्या पेरणी क्षेत्रात घट नोंदवली गेली आहे. शेतकऱ्यांनी मूग पिकाऐवजी मका आणि सोयाबीनसारख्या पिकांकडे आपला कल वळवला आहे. तसेच जिल्ह्यात उडीद आणि तूर या कडधान्यांची देखील पुरेशा प्रमाणात पेरणी झालेली आहे.
21 Jul 2026 12:24 PM (IST)
अलिबागहून पनवेलला जाणारी विनाथांबा एसटी बसचा मंगळवारी (दि.21 ) सकाळी अपघात झाला. सुदैवाने एसटीतील 38 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ही घटना पेझारी येथील चेक पोस्ट जवळ घडली. चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या एका बाजूला पलटी झाली.त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
21 Jul 2026 12:13 PM (IST)
पावसाळ्यात शहरात झालेल्या पूर परिस्थितीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेडिक्लेमसह आवश्यक आरोग्य सुविधा दिल्या जात नाहीत. घाण पाण्यात काम करताना संसर्ग झाल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर ऑन-ड्यूटी अपघात आणि हृदयविकाराने बाधित कर्मचारी उपचारासाठी कर्जबाजारी झाले आहेत.
पालिका प्रशासन आणि कंत्राटदारांनी मृत व जखमी कर्मचाऱ्यांना न्याय देऊन उपचाराची जबाबदारी स्वीकारावी, अन्यथा आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर महापालिका प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित आयुक्तांकडे जाण्याचे सांगितले. मात्र, संबंधित आयुक्तांनी "महानगरपालिका आयुक्तांनी या विषयावर बोलण्यास मनाई केली आहे," असे सांगत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर प्रशासनाची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही.
21 Jul 2026 12:05 PM (IST)
एका अपघाताचे दृष्य वेगाने शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक मोठा अपघात झाल्याचे दिसते. रस्ता ओलसर असतो ज्यामुळे बाईक घसरली जाते आणि बाईकस्वार रस्त्यावर कोसळतो. घटनेतील दृष्ये अनेकांना थक्क करणारी आहेत. मुख्य म्हणजे व्यक्ती मृत्यूच्या काठापर्यंत जातो पण म्हणतात काळ आला नसेल तर काही होऊ शकत नाही. व्हिडिओतही असंच काहीसं घडलं.
21 Jul 2026 11:55 AM (IST)
टेक कंपनी Vivo ने त्यांच्या X300 सीरीजच्या आणखी एका नवीन स्मार्टफोनची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo X300e या नावाने सादर केला आहे. कंपनीने स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर देखील सुरु केली आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री 27 जुलैपासून सुरु होणार आहे.
21 Jul 2026 11:45 AM (IST)
भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी खूशखबर आहे. सेना आता भरती प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक बनवण्याच्या तयारीत आहे. नवीन योजनेअंतर्गत जेईई (JEE), क्लॅट पीजी (CLAT PG) आणि नीट पीजी (NEET PG) यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांच्या स्कोअरच्या आधारे उमेदवारांना थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यामुळे स्वतंत्रपणे लेखी परीक्षा घेण्याची गरज कमी होईल आणि पात्र तरुणांना सैन्यात सामील होण्याची उत्तम संधी मिळेल.
21 Jul 2026 11:40 AM (IST)
मध्यपूर्वेतील युद्ध आणखी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. इराणच्या जॉर्डनवरील हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे अमेरिका-इराण तणाव वाढू शकतो. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आक्रमक इशारा दिला आहे. अमेरिकन सैनिकांना लक्ष्य केल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
21 Jul 2026 11:25 AM (IST)
पुण्यातील 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर वाघोली पोलिसांनी फरान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिल यांना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.