Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी आमदार झाल्यानंतर विधानसभेत पहिल्यांदा मराठा आरक्षणाविषयी…”; अभिजीत पाटील यांचे महत्वाचे विधान

माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांची रविवारी मतदार संघातील पिराची कुरोली, देवडे, खेडभोसे, शेवते, तरटगाव आणि पटवर्धन कुरोली येथे सभा पार पडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 05, 2024 | 04:55 PM
"मी आमदार झाल्यानंतर विधानसभेत पहिल्यांदा मराठा आरक्षणाविषयी..."; अभिजीत पाटील यांचे महत्वाचे विधान

"मी आमदार झाल्यानंतर विधानसभेत पहिल्यांदा मराठा आरक्षणाविषयी..."; अभिजीत पाटील यांचे महत्वाचे विधान

Follow Us
Follow Us:

पंढरपूर/नवनाथ खिलारे : विधानसभा निवडणुकीसाठी भरलेले अर्ज घेण्याची मुदत संपल्यानंतर आता राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे. अशातचं आता माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांची रविवारी मतदार संघातील पिराची कुरोली, देवडे, खेडभोसे, शेवते, तरटगाव आणि पटवर्धन कुरोली येथे सभा पार पडली. यावेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हलगीच्या कडकडाटासह फटाक्याच्या आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात अभिजीत पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या सभेस संबोधित करताना अनेक वकत्यांनी बोलतांना सांगितले की, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारा महाराष्ट्रातील ऐकमेव नेता म्हणजे अभिजीत आबा पाटील आहेत. कोरोना महामारीच्या संकटात त्यांनी त्यांचे आर्थिक नुकसान करून ऑक्सिजन प्लांट तयार केला होते, डीव्हीपी मॉल बंद करून कोविड हॉस्पिटल चालू केले होते. यामुळे त्यांना माणसातील देवमाणुस म्हणून ओळखले जाते असे उद्गार अनेकांनी यावेळी काढले.

विद्यमान आमदारांनी काय केलं? – पाटील

पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील सभेत अभिजीत पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की, विद्यमान आमदारांनी माढ्यात कोणताही विकास केला नाही. महापुरुषांचे पुतळे ही उभा करू शकले नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाला दर दिला नाही. करकंब मध्ये नगरपरिषद होऊ दिली नाही. माढ्याला पिण्याचे पाणी सुद्धा ते देऊ शकले नाहीत. यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे.  सत्ताधारी म्हणतात की आम्ही विकास केला. मात्र इथले हजारो तरुण बेरोजगार कसे असा प्रश्न उपस्थित करत या सर्व समस्या सोडवायच्या असतील तर मला संधी द्या. एमआयडीसीचा प्रश्न एका वर्षात पूर्ण करून दाखवतो. या माध्यमातून या भागातील वीस हजार तरुणांच्या हाताला काम देण्याची भूमिका पार पाडेन. मी आमदार झाल्यानंतर विधानसभेतील पहिल्या भाषणात मराठा आरक्षण याविषयी प्रश्न उपस्थित करीन, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिला.

हे सुद्धा वाचा : पुरंदरमध्ये होणार तिरंगी लढत; शिवतारेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठबळ?

यावेळी अभिजीत पाटील यांना देवडे येथील मराठा उपोषणकर्ते संतोष झांबरे, जिजाबा तुकाराम पाटील, कल्याण काळे गटाचे शरद शिंदे, परिचारक गटाचे ज्ञानेश्वर गंगाधर बनसोडे, नांदोरे येथील मोतीलाल आप्पा भिंगारे, तरटगावचे परिचारक गटाचे भारत कांबळे, नांदोरे येथील परिचारक गटाचे रविकांत माने या सर्वांनी अभिजीत पाटील यांना आमदार करण्यासाठी आपल्या सहकार्यांनसोबत त्यांच्या गटात प्रवेश करून पाठिंबा दिला. दिवसेंदिवस अभिजीत पाटील यांना माढा मतदारसंघातून तसेच मतदार संघातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांमधून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यांच्या सभांना नागरिक रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत आहेत.

Web Title: Abhijit patil has made an important statement about maratha reservation nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 04:52 PM

Topics:  

  • BJP
  • Madha
  • maharashtra
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
1

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
2

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
3

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
4

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.