देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; बोलेरो कोसळली कालव्यात, एकाच कुटुंबातील ९ जणांसह ११ जणांचा मृत्यू
लाखनी : धान रोवणीच्या कामासाठी मजूर घेऊन जात असलेले वाहन नियंत्रण सुटून झाडावर आदळले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मासलमेटा गावाजवळ घडला. या अपघाताने जिल्ह्यातील बेजबाबदार मजूर वाहतुकीचा प्रकार समोर आला.
जिल्ह्यात धान पीक हे प्रमुख असून, सध्या रोवणीच्या हंगामात मजुरांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. साकोली तालुक्यातील किन्ही (एकोडी) येथून भंडारा तालुक्यातील शहापूर, जवाहनगर येथे 21 महिला व पुरुष मजूर घेऊन मिनी ट्रक (एमएच 40 सीडी 5130) वाहन सकाळी रवाना झाले. सुमारे सात वाजताच्या सुमारास तिरोडा-लाखनी मार्गावरून जात असताना मासलमेटा गावाजवळ वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या मोहाच्या झाडावर आदळले.
या अपघातात काही मजूर गंभीर जखमी झाले, तर काहींना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
एका महिलेचा रस्त्यात मृत्यू
गंभीर अवस्थेत असलेल्या 9 मजुरांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, वाटेतच सायत्रा नेवारे (वय 50) या महिलेचा मृत्यू झाला. छत्रपती बोरकर (40), जोत्सना सोनवाणे (36), वंदना सोनावणे (34), प्रमिला शेंडे (40), रत्नमाला बोरकर (35), वैशाली सोनवाणे (37), रामकला नेवारे (30), प्रमिला गेडाम (42) अशी जखमींची नावे आहेत. 5 महिला सध्या लाखनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून एक महिला खासगी रुग्णालयात दाखल आहे.
लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अपघातानंतर वाहनचालकाविरुद्ध निष्काळजीपणे व हयगतीने वाहन चालविल्याप्रकरणी मोटरवाहन कायद्यानुसार लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजूर वाहतुकीसाठी अशा प्रकारच्या धोकादायक वाहनांचा वापर होत असल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर येथे अपघात
दुसऱ्या एका घटनेत, पुणे-सातारा महामार्गावर वेळू (ता.भोर) येथे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने अचानक विरुद्ध दिशेच्या लेनवर घुसून अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर तिघांना गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. याबाबत गोरक्षनाथ बाबासाहेब खुटवड (वय ४९ रा.उंबरे ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.