किल्ले सिंहगडावर तरूण बेपत्ता (फोटो- सोशल मिडिया)
Sinhgad Fort Cctv Video: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध किल्ले सिंहगडावर फिरायला गेलेला एक तरूण बेपत्ता झाला आहे. इतके दिवस होऊनही त्याचा शोध लागला नाही. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. सुरुवातीस तो सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कड्यावरून खाली कोसळला असावा असा अंदाज बांधला जात होता. मात्र आता सिहगड किल्ल्याच्या परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजने या घटनेला एक नवीन वळण दिले आहे.
एक तरुण आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी किल्ले सिंहगडावर आला होता. किल्ल्यावर ते तानाजी कड्यावर फिरण्यासाठी गेल्याचे समजते आहे. त्यावेळेस त्याने लघुशंकेसाठी जातो असे त्याच्या मित्रांना सांगितले. मात्र तो बराच वेळ परत न आल्याने त्याच्या मित्रांनी शोधमोहीम सुरु केली. मात्र काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?
काही दिवसांपूर्वी एक तरूण आपल्या मित्रांसाह किल्ले सिंहगडावर फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला आहे. तो खरेच कड्यावरून कोसळला आहे की त्याच्यासोबत घातपात झाला आहे असा संशय निर्माण झाला आहे. याला कारण म्हणजे समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज.
किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजने या घटनेचे गूढ वाढवले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पळून जात असल्याचे दिसत आहे. बऱ्याच वेळापासून या परिसरात या तरुणाचा शोध घेतला जात आहे. समोर आलेल्या फुटेजमुळे पोलिसांसमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.
सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती बेपत्ता झालेला तरूण तोच असला, तर त्याने मुद्दाम केल्याचा संशय पोलिसांना येत आहे. त्यामुळे पोलिस आता हे प्रकरण कसे सोडवतात हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.
Pune News: लघुशंकेने केला घात! फिरण्यासाठी सिंहगडावर आला अन्…; तरुणासोबत नेमके घडले तरी काय?
नेमके काय घडले? |
हैदराबादवरुन आलेला तरूण आपल्या मित्रांसाह किल्ले सिंहगड फिरण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्या तरुणाने आपल्या मित्राना मी लघुशंकेला जाऊन येतो असे सांगितले. खूप वेळ तो न आल्याने मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या परिसरात मित्रांना त्याची चप्पल संपळदी. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तो तरूण तानाजी कड्यावरून कोसळला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच आता समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजने आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. पोलिस आता कशाप्रकरे तपास करतात हे पहावे लागणार आहे.






