Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

St Bus : नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

एसटी महामंडळाने 5150 इलेक्ट्रिक बसेस कंत्राटी पद्धतीने घेण्यासाठी इव्हे ट्रान्स या कंपनीशी करार केला होता. याचसंदर्भात आता परिवहनमंत्री प्रतार सरनाईक यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 30, 2025 | 03:54 PM
नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा, परिवनमंत्र्यांचे निर्देश (फोटो सौजन्य-X)

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा, परिवनमंत्र्यांचे निर्देश (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई  : प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.

मंत्रालयात कंपनी प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कंपनीचे के. व्ही प्रदीप आदी उपस्थित होते. बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षीत असल्याचे सूचीत करीत मंत्री सरनाईक म्हणाले, कंपनीने दिलेल्या बसेसचा चालनीय तोटा लक्षात घेता, राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठी (viability gap funding) चा प्रस्ताव पाठविण्यात यावा. कंपनीने आतापर्यंत 220 बसेसचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनीने नियोजन करावे.

सोलापूर जिल्हापरिषदेमध्ये ‘बदली’वरुन गोंधळ; अनेकजण पदाला चिटकून बसल्याने कर्मचारी संतापले

या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले, भाडेतत्वावर कंपनीने 5150 ईलेक्ट्रीक बसेस पुरवठा करण्याचा करार करण्यात आला. त्यापैकी 220 बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये 12 मीटर व 9 मीटर लांबीच्या बसेस आहेत. महामंडळाने विभागनिहाय नवीन खाते तयार करून इलेक्ट्रीक बसच्या उत्पन्नामधून कंपनीला बिलांची रक्कम देण्यात येत आहे. त्यानुसार 60 कोटी रूपये कंपनीला देण्यात आले आहे. उर्वरित 40 कोटी रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाला 12 मीटर बस चालविताना प्रति किलोमीटर 12 रूपये आणि 9 मीटर बस चालविताना 16 रूपये प्रति किलोमीटर तोटा ग्राह्य धरून पुढील काही वर्षात 3191 कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. तोट्याची रक्कम राज्य शासनाकडून देण्याचे मान्य केल्यास बस पुरवठ्याचा हा करार पूर्णत्वास जावू शकतो. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्समंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

100 कोटी रुपये वाया जाण्याचा आरोप

नोव्हेंबर 2023 मध्ये या कंपनीसोबत करार करण्यात आला होता. करारानुसार 4,000 बस मिळणे अपेक्षित होते, पण आतापर्यंत फक्त 220 बस मिळाल्या आहेत. या बससाठी एसटीने 80 चार्जिंग स्टेशन उभारली असून त्यावर अंदाजे 100 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हे पैसे सरकारकडून मिळाले असले तरी ते वाया गेल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.

Manikrao Kokate News: ‘ढेकळांचे पंचनामे करायचे का?’ कृषीमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाने नव्या वादाची ठिणगी

Web Title: According to the new schedule the company should supply e buses as instructed by the transport minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • msrtc
  • Mumbai
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
1

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..
2

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
3

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

ST Bus: UPI मार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची पसंती, एसटीच्या खात्यात ६४ कोटींचा महसूल गोळा
4

ST Bus: UPI मार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची पसंती, एसटीच्या खात्यात ६४ कोटींचा महसूल गोळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.