Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिरम ऐवजी हातात आले रद्दीचे बंडल, औषध विक्रेत्याला तब्बल चार लाखाचा गंडा; दोघांना अटक

दुबईचे चलन असलेले 700 दिरम देण्याचे आमिष दाखवत 3 आरोपींनी डोंबिवलीतील एका औषध विक्रेत्याला तब्बल चार लाखाचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खोणी पलावा परिसरातून दोघांना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपी नागरिकांना दुबईतील चलन दिरम देण्याचे आमिष दाखवून त्या मोबदल्यात लाखो रुपये उकळत होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 05, 2024 | 02:33 PM
दिरम ऐवजी हातात आले रद्दीचे बंडल, औषध विक्रेत्याला तब्बल चार लाखाचा गंडा; दोघांना अटक

दिरम ऐवजी हातात आले रद्दीचे बंडल, औषध विक्रेत्याला तब्बल चार लाखाचा गंडा; दोघांना अटक

Follow Us
Close
Follow Us:

दुबईचे 700 दिरम देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी डोंबिवलीतील एका औषध विक्रेत्याला तब्बल चार लाखाचा गंडा घातल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. औषध विक्रेत्याला गंडा घालणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत होते. त्यांच्या तपासाला आता यश आलं असून मानपाडा पोलिसांनी दोन भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

हेदेखील वाचा- न्यायालयात सादर केलं लिव-इन रिलेशनशिप अ‍ॅग्रीमेंट आणि मिळाला जामीन; काय आहे प्रकरण

मानपाडा पोलिसांनी डोंबिवली जवळील खोणी पलावा परिसरात सापळा रचत दोन भामट्यांना अटक केली आहे .मोहम्मद शेख व मोहम्मद चौधरी असे या दोन्ही आरोपींची नाव आहेत. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून पोलीस शोध घेत आहेत. हे दोन्ही आरोपी नागरिकांना दुबईतील चलन दिरम देण्याचे आमिष दाखवून त्या मोबदल्यात लाखो रुपये उकळत होते. आपली नाव बदलून नागरिकांची फसवणूक करत होते. दोन्ही आरोपींनी डोंबिवलीतील एका औषध विक्रेत्याची देखील फसवणूक केली होती. शिलाय या दोन्ही आरोपींनी आणखी काही जणांची फसवणूक केली असल्याचा संशय मानपाडा पोलिसांना असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका औषध विक्रेत्याला तीन अनोळखी इसमानी दुबई देशाचे चलन असलेले सातशे दिरम देतो, असे सांगत त्या मोबदल्यात तब्बल 12 लाख रुपयांची मागणी केली. औषध विक्रेत्याला या तिन्ही आरोपींचा विश्वास वाटल्याने त्याने या तिघांना 4 लाख रुपये दिले. या तिघांनी त्याच्या हातात एक बंडल ठेवले आणि त्यानंतर ते तिघेही पसार झाले. बंडल उघडून पाहताच त्यात कागदाची रद्दी असल्याचे औषध विक्रेत्याच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याने त्याने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

हेदेखील वाचा- शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक; पोलिसांची मोठी कारवाई

या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संपत फडोळ, महेश राळेभात, प्रशांत आंधळे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. या गुन्ह्यातील दोन जण खोणी पलावा परिसरातील येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी या परिसरात सापळा रचला.

पोलिसांना खोणी पलावा परिसरात दोन संशयित इसम फिरताना आढळले. काही वेळातच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरु केली. यावेळी दोन्ही आरोपींनी पोलिसांना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी मोहम्मद शेख व मोहम्मद चौधरी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांकडून 1 लाख 78 हजार रुपयांची रोकड, युनायटेड अरब अमीरत सेंट्रल बँकेचे नावे असलेले शंभर रुपये किमतीचे दिरम, दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Accused cheated with drug dealer of four lakh rupees by giving junk instead of dirhams 2 arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 02:33 PM

Topics:  

  • crime news
  • Dombivali Crime
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
2

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
3

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
4

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.