महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणं भोवलं; कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा (File Photo : Court)
मुंबई : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या पुण्यातील व्यक्तीला तब्बल 13 वर्षांनी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणात वर्षानुवर्षे छळ केल्याचा आणि भांडणानंतर आपल्या पत्नीसह मुलीला नग्न अवस्थेत घराबाहेर उभे राहण्यास भाग पाडल्याचा आरोप याचिकाकर्त्यांवर होता.
हेदेखील वाचा : धक्कादायक! पुण्यात डंपर पलटी होऊन 2 विद्यार्थिनींचा मृत्यू, शरीराचे तुकडे फावड्याने…
वाळू कंत्राटदार संतोष सुधाकर शिलीमकरला (वय 32) ऑगस्ट 2024 मध्ये पुणे सत्र न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 498 अ (क्रूरता) अंतर्गत दोषी ठरवून 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. त्यानिर्णयाला शिलीमकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या याचिकेवर नुकतीच न्या. आर.एन. लड्डा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडली.
याचिकाकर्ताविरोधात दाखल खटल्यावर लवकरात लवकर सुरुवात होईल, याची शक्यता कमी आहे. अशा प्रलंबित खटल्यांमध्ये व्यापक दृष्टिकोन बाळगून शिक्षेला स्थगित देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा दाखलाही न्यायालयाने यावेळी दिला. आरोपीविरोधातील पुरावे आणि आरोप पाहता त्याला तुरुंगवासात ठेवण्याची कोणतीही आवश्यकता असल्याचे दिसून येत नाही, असेही अधोरेखित करून 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर आणि अटींसह न्यायालयाने याचिकाकर्त्यांला जामीन मंजूर केला.
शारीरिक, भावनिक छळ केल्याचा आरोप
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संतोष आपल्या पत्नीचा वारंवार छळ करीत असे. विशेषतः त्यांच्या दोन मुलींच्या जन्मानंतर, ज्यापैकी एका मुलीला वैद्यकीय कारणांमुळे वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत होते. 16 जुलै 2012 रोजी संतोष यांनी आपल्या मित्रांसाठी मासांहारी जेवण शिजवण्याचे पत्नीला सांगितले. दोघांमध्ये भांडण सुरू झाले.
पत्नीसह मुलीला नग्नावस्थेत ठेवले बाहेर
संतोषने पत्नीसह त्यांच्या धाकट्या मुलीला रात्रभर घराबाहेर नग्न अवस्थेत उभे राहण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. महिलेने तिच्या कुटुंबाला सांगितली. दुसऱ्या दिवशी, शारीरिक आणि भावनिक छळ सहन न झाल्यान तिने त्यांच्या घराजवळील विहिरीत उडी मारून जीवन संपवले. सत्र न्यायालयाने पुराव्याच्या आधारे संतोषला दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
संतोषने अॅड. सत्यव्रत जोशी यांच्यामार्फत शिक्षेला आव्हान दिले. छळाचा किंवा मृताला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा हेतू असल्याचा कोणताही थेट पुरावा नसल्याचा युक्तिवाद केला. ऐकीव पुरावे आणि सुसाईड नोट नसण्यावर प्रकाश टाकून फिर्यादीच्या खटल्यातील विसंगतींकडे न्यायालयाचा लक्ष वेधण्याचाही जोशींनी प्रयत्न केला. आरोपांच्या गांभीर्यावर भर देऊन अतिरिक्त सरकारी वकीलांनी अपीलाला विरोध केला.
हेदेखील वाचा : Walmik Karad News: वाल्मिक कराडच्या संपत्तीतून आणखी धक्कादायक धागेदोरे मिळतील; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट