Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका; चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई

चाकण शहरातील अनधिकृत प्लॉटिंगविरुद्ध नगरपरिषदेकडून राबविण्यात आलेली महत्त्वपूर्ण मोहीम तिसऱ्या दिवशी पूर्ण झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 11, 2025 | 06:32 PM
नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका; चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई

नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका; चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई

Follow Us
Close
Follow Us:
  • नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका
  • चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई
  • विक्रेते आणि सल्लागारांपासून सावध राहणे अत्यावश्यक
चाकण/अतिष मेटे : चाकण शहरातील अनधिकृत प्लॉटिंगविरुद्ध नगरपरिषदेकडून राबविण्यात आलेली महत्त्वपूर्ण मोहीम तिसऱ्या दिवशी पूर्ण झाली आहे. 8 डिसेंबरपासून रोजी सुरू झालेल्या मोहिमेत महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, 1966 अंतर्गत पूर्वी बजावलेल्या नोटीसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक व डेव्हलपरांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.

नगरपरिषदेकडून यापूर्वीच अनधिकृत लेआउट धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र काही जणांनी निर्धारित मुदतीत पालन न केल्यामुळे प्रशासनाने सक्त कारवाई करत अनधिकृत प्लॉटिंग हटवण्याची मोहीम उभारली. चाकणमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई प्रथमच होत असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. यामुळे अनधिकृत भूखंड विक्री करणाऱ्यांवर निश्चित अंकुश बसेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

कारवाईचा तपशील

कारवाईत तीन अधिकारी, तीन कर्मचारी, पाच पोलीस कर्मचारी, चार जेसीबी यंत्रणा, व्हिडिओग्राफर, अग्निशमन बंब, ट्रेलर आदी पथकांचा समावेश होता. एकूण 21 अनधिकृत भूखंडांवर कारवाई करण्यात आली आहे. हटविण्यात आलेल्या लेआउटचे एकत्रित क्षेत्रफळ अंदाजे 55 एकर आहे.

तोतया विक्रेते, सल्लागारांपासून सावध राहणे अत्यावश्यक

चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी सांगितले की, “अनधिकृत प्लॉटिंग व बांधकामांविरुद्धची कारवाई पुढील काळातही कठोरपणे सुरू राहील. नागरिकांनी केवळ नगरपरिषदेत नियमित मंजूर असलेल्या प्लॉटचीच खरेदी करावी. तोतया विक्रेते आणि सल्लागारांपासून सावध राहणे अत्यावश्यक आहे.” चाकण शहरात अनधिकृत बांधकाम व प्लॉटिंगला आळा घालण्यासाठी नगरपरिषदेकडून करण्यात आलेली ही मोहीम निर्णायक ठरत असल्याचे प्रशासनाच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे.

Web Title: Action has been taken against unauthorized plotting in chakan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 06:32 PM

Topics:  

  • Chakan News
  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra

संबंधित बातम्या

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
1

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

सावळज स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार! लिंबू, काळे दोरे, कुंकू आढळल्यामुळे नागरिक संतापले
2

सावळज स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार! लिंबू, काळे दोरे, कुंकू आढळल्यामुळे नागरिक संतापले

रेतीतस्करांविरुद्ध महसूल परिवहन विभागाचे कठोर धोरण! रेतीमाफियांचा वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता
3

रेतीतस्करांविरुद्ध महसूल परिवहन विभागाचे कठोर धोरण! रेतीमाफियांचा वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता

उसाला फुटले तुरे, शेतकरी चिंतेत; कारखान्यांनी वेळेत ऊसतोड करण्याची मागणी
4

उसाला फुटले तुरे, शेतकरी चिंतेत; कारखान्यांनी वेळेत ऊसतोड करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.