पुणे : हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानव्ये (एमपीडीए) कारवाई केली. पोलीस आयुक्यांच्या आदेशानुसार वर्षभरासाठी त्याला कोल्हापुर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत शहरातील तब्बल ८८ गुंडावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे.
राकेश शंकर ठोकळ (वय २१, रा. खजुरे वस्ती, वैदुवाडी, हडपसर) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. ठोकळ याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्ज्ञ बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलीस ठाणयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी तयार केला होता.
पोलीस आयुक्त गुप्ता यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. शहरात गुंडगिरी करणाऱ्या गुंडांच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत शहरातील ८८ गुंडांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.