Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिनाथ साखर कारखान्याच्या लिलावाला नारायण पाटीलांचा विरोध; ‘रक्त सांडू पण आदिनाथ विकू देणार नाही’

करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संभाव्य लिलावावरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार नारायण पाटील यांनी कारखाना कोणत्याही परिस्थितीत विकू देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 02, 2026 | 08:59 PM
आदिनाथ साखर कारखान्याच्या लिलावाला नारायण पाटीलांचा विरोध

आदिनाथ साखर कारखान्याच्या लिलावाला नारायण पाटीलांचा विरोध

Follow Us
Follow Us:

करमाळा प्रतिनिधी : सहकाराचे मंदिर असलेला व उसाच्या कोठारात वसलेला राज्यातील एकमेव करमाळा तालुक्यातील शेळगाव भाळवणी येथीलआदिनाथ सह साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत विकला जाऊ देणार नाही वेळ प्रसंगी कोर्टात जाऊ ,रक्त सांडू पण सभासद कामगार यांच्या घामाचा दाम कोणाच्या घशात जाऊ देणार नाही असा खणखणीत इशारा आमदार तथा आदिनाथ चे चेअरमन नारायण आबा पाटील यांनी जेऊर येथे पत्रकार परिषदेत दिला.

आज पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना नारायण पाटील म्हणाले आदिनाथ ला कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी मीअतोनात प्रयत्न केले. भाडेतत्त्वावर, देण्यास देखील तयार होतो.मात्र या बाबत सहकार्य झाले नसल्याची खंत आमदार नारायण पाटील यांनी बोलून दाखवली.

नव्याने साखर उद्योगात उदयाला आलेले ओंकार शुगर चे बाबूराव बोत्रे पाटलांनी या लिलाव प्रकियेत सहभाग घेऊन ४५० कोटीची मालमत्ता असलेला आदिनाथ १२५ कोटीत विकत घेण्याचा डाव टाकला असल्याचा आरोप करत कोणतीही शक्ती आली तरी विकत घेऊन कारखाना चालवू देणार नाही हे लक्षात ठेवावे असा इशारा नारायण पाटील यांनी दिला आहे.

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती

आदिनाथ सह साखर कारखान्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांची एकहाती सत्ता आहे.आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने आमदार नारायण पाटील हे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संपर्कात होते.नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत देखील भाजपला पुरक भुमिका घेतली होती.

आदिनाथ ला कर्ज उपलब्ध झाल्यावर उस उत्पादक शेतकरी ,कामगार यांची देणी देऊन आदिनाथ सुरू करता येईल या ऐकमेव भावनेने नारायण पाटील यांनी भाजपशी सलगी केली होती ,असे असून कर्ज उपलब्ध का झाले नाही? असे पत्रकार यांनी विचारता आमदार नारायण पाटील म्हणाले ,मुख्यमंत्री पालकमंत्री या बाबत सकारात्मक होते मात्र तालुक्यातील विरोधक नेतेमंडळी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून नारायण पाटील यांनी आदिनाथ सुरू केला तर आमचे राजकीय भवितव्य धोक्यात आहे अशी गळ घालून मदत मिळवून देण्यास अडथाळा करत होते असा आरोप आमदार नारायण पाटील यांनी केला.

पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीप्रश्न मिटणार! भामा आसखेड प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

आदिनाथ हा एकतर भाडेतत्त्वावर चालवावा किंवा संचालक मंडळास कर्ज उपलब्ध करून द्यावे अशीच आमची आजही मुख्यमंत्री ,पालक मंत्री यांच्याकडे मागणी आहे तालुका पातळीवरील राजकारणा साठी सहकाराचे मंदिर असलेल्या आदिनाथ चा बळी देऊन कामगारांवर अन्याय करू नये अशी भुमिका आमदार नारायण पाटील यांनी मांडली.

यावेळी आदिनाथचे व्हाईस चेअरमन महेंद्र पाटील, संचालक देवानंद बागल, डॉ हरीदास केवारे, डॉ अमोल घाडगे, राहुल सावंत, किरण कवडे, विजयसिंह नवले, दत्तात्रय गव्हाणे, दत्ताबापू देशमुख, श्रीमंत चौधरी, रवीकिरण फुके, आबासाहेब अंबारे, हनुमंत सरडे, रामेश्वर तळेकर, महादेव पोरे . संतोष खाटमोडे पाटील आदि उपस्थित होते

यावेळी संचालकांनीही बोत्रे पाटील यांना उघड विरोध करत आमदार नारायण आबा पाटील यांच्या पाठीशी आम्ही एकजुटीने उभे असल्याचे ठामपणे सांगितले यावेळी आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व शेवटी सर्वांचे आभार मानले

Web Title: Adinath sugar factory narayan patil opposes auction karmala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Karmala
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
1

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.