Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: अतिरिक्तांचे मुंबईतच समायोजन! वेतनही अबाधित राहणार; शेलार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई अध्यक्ष डॉ. राजू बंडगर यांनी बैठकीत अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नाची सविस्तर मांडणी करत शासनाच्या परिपत्रकानुसार मुंबई महापालिकेच्या शाळांमधील रिक्त जागांवर त्यांचे समायोजन करण्याची मागणी केली.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 21, 2026 | 11:30 AM
अतिरिक्तांचे मुंबईतच समायोजन! वेतनही अबाधित राहणार; शेलार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

अतिरिक्तांचे मुंबईतच समायोजन! वेतनही अबाधित राहणार; शेलार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

Follow Us
Follow Us:

मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री तथा राज्याचे कॅबिनेटमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासन आणि मुंबई महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त शिक्षकांना मुंबईबाहेर न पाठवता मुंबई महापालिका शाळांमध्येच समायोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई अध्यक्ष डॉ. राजू बंडगर यांनी बैठकीत अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नाची सविस्तर मांडणी करत शासनाच्या परिपत्रकानुसार मुंबई महापालिकेच्या शाळांमधील रिक्त जागांवर त्यांचे समायोजन करण्याची मागणी केली.(फोटो सौजन्य – AI)

कोस्टल रोडवर साकारणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र! रिलायन्सकडून ५१ हेक्टरचा कायापालट; पर्यटन, मनोरंजन केंद्रे उभारली जाणार

महिन्याच्या आत शासनाला अहवाल सादर करावा

तसेच समायोजन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शिक्षकांचे वेतन बंद करण्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावर आशीष शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अतिरिक्त शिक्षकांचे मुंबई महापालिका शाळांमध्ये समायोजन करण्याचे निर्देश दिले. तसेच कोणत्याही शिक्षकाचे वेतन थांबवू नये, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले.समायोजन प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी शिक्षण विभाग आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विषयाचा सविस्तर अभ्यास करून एका महिन्याच्या आत शासनाला अहवाल सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षक आघाडीने केला सातत्याने पाठपुरावा

बैठकीनंतर डॉ. राजू बंडगर यांनी सांगितले की, अतिरिक्त शिक्षकांच्या हितासाठी भाजप शिक्षक आघाडीने सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या सेवेसह आर्थिक हिताचे संरक्षण होणार आहे.या बैठकीस शिक्षण आयुक्त सच्छिंद्र प्रताप सिंह, शिक्षण संचालक महेश पालकर, शिक्षण उपसचिव आबासाहेब कवळे, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ, विभागीय सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुभाष सावंत, महापालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कीर्तिवर्धन किरतकुडवे यांच्यासह भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई सचिव संदीप खेडकर, उमेश जागडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Adjustment of surplus staff within mumbai itself salaries to remain protected decision taken at a meeting chaired by shelar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Mumbai News
  • Teacher

संबंधित बातम्या

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
1

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
2

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
3

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
4

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.