Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Adulteration Complaint: भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! थेट तुकाराम मुंढेंकडे नोंदवा तक्रार; टोल फ्री क्रमांक जाहीर!

Tukaram Mundhe News: महाराष्ट्र एफडीएचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित गुटखा आणि अन्न भेसळीच्या तक्रारींसाठी १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. राज्यात २०३ ठिकाणी छापे मारून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 05, 2026 | 05:08 PM
भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! थेट तुकाराम मुंढेंकडे नोंदवा तक्रार (Photo Credit- X)

भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! थेट तुकाराम मुंढेंकडे नोंदवा तक्रार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही!
  • थेट तुकाराम मुंढेंकडे नोंदवा तक्रार
  • टोल फ्री क्रमांक जाहीर!
मुंबई: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर, राज्यभर बंदी भैसळ अन्नपदार्थ असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याविरुद्ध कठोर कारवाई मोहीम राबवली जात आहे. गेल्या काही दिवसांत २०३ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, यात १०२ जणांना अटक करण्यात आली आहे आणि राज्यभरातील सुमारे ६८ दुकाने व हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकताच एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि राज्यभरात बंदी असलेल्या गुटखा व पान मसाला विक्रेत्यांविरुद्ध जलद व निर्णायक कारवाई सुरू केली. दरम्यान, तक्रारी नोंदवण्यासाठी महाराष्ट्र एफडीएने एक टोल-फ्री क्रमांक जारी केला आहे.

एफडीएचा टोल-फ्री क्रमांक

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक इशारा दिला आहे. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, नागरिकांना थेट तक्रार करण्याचे आवाहन करत त्यांनी यासाठी एक टोल-फ्री क्रमांक आणि ईमेल पत्ता उपलब्ध करून दिला आहे.

थेट तक्रार कुठे करावी?

अन्नपदार्थ, औषधे, गुटखा किंवा पान मसाला यांच्याशी संबंधित समस्यांबाबत तक्रार कोठे नोंदवायची, याची अनेकदा लोकांना माहिती नसते. ही अडचण दूर करण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना त्यांच्या तक्रारी थेट नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र सरकारने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली असून, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणालाही शंका असल्यास त्यांनी एफडीएच्या टोल-फ्री क्रमांकावर किंवा ईमेलद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.

टोल-फ्री क्रमांक: १८००२२२३६५
ईमेल: jc-foodhq@gov.in

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका आहे?
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा ई-मेलवर तक्रार नोंदवा…
📞 १८००२२२३६५
✉️ jc-foodhq@gov.in #अन्नसुरक्षा #ग्राहकजागृती #भेसळमुक्तअन्न #अन्नगुणवत्ता #जागरूकग्राहक#FoodSafety #FoodQuality #MaharashtraGovernment… pic.twitter.com/gd0ARUPXV7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 4, 2026

Tukaram Mundhe: ६ दिवसांत २०३ छापे, १०२ अटक; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर सर्जिकल स्ट्राईक, ६८ दुकाने-हॉटेल्स सील!

तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी पदभार स्वीकारला

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एफडीए अलीकडच्या काळात चर्चेत होते, हे उल्लेखनीय आहे. आता तुकाराम मुंढे यांची एफडीए आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.

बीडमध्ये १८ लाख रुपयांचा माल जप्त

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर कठोर अंमलबजावणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, ४ मे रोजी धुळे जिल्ह्यात एफडीएने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा पकडला आणि १८.५० लाख रुपये किमतीचा माल जप्त केला. मुंबई-आग्रा महामार्गावरून प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक केली जात असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, एफडीएने (FDA) तो माल जप्त केला आणि राजस्थानमधील रहिवासी असलेल्या सुरेश कुमार गोवरिया या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

‘मुंढे साखर आयुक्त झाल्यास कारखानदार सरळ होतील’, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ पंढरपुरात दूध अभिषेक; शेतकऱ्यांचा मोठा दावा

Web Title: Adulterators will no longer be spared lodge complaints directly with tukaram mundhe toll free number announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • FDA
  • Food and Drug Administratio
  • maharashtra
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
1

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
2

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
3

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.