Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Farmers Protest Maharashtra: पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी येडशी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 21, 2026 | 05:27 PM
कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Follow Us
Follow Us:
  • पावसाअभावी पिके संकटात
  • हेक्टरी ५० हजारांच्या मदतीसाठी येडशीत शेतकरी रस्त्यावर
  • ‘मागण्या मान्य करा, अन्यथा जिल्हाभर आंदोलन’
  • कोरड्या दुष्काळासाठी येडशीत शेतकऱ्यांचा एल्गार
धाराशिव : पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी येडशी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा संयोजक संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दीड तास आंदोलन झाले.

पावसाअभावी सोयाबीन, मका, उडीद, मूग, ऊस, पालेभाज्या व फळभाज्यांसह विविध पिकांचे नुकसान झाले आहे. गतवर्षी अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर यंदा पावसाच्या खंडामुळे पिके संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी दोन लाख रुपयांचे अनुदान द्यावे, २००९ ते २०२६ या कालावधीतील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ द्यावा, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, तसेच पीक विमा कंपनीने रद्द केलेले चार ट्रिगर पुन्हा लागू करून २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

उसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू झाल्यास साखर उताऱ्यावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना कमी दर मिळण्याची शक्यता असल्याने शासनाने त्याबाबत खबरदारी घ्यावी, गूळ पावडर कारखान्यांना एफआरपीच्या कक्षेत आणावे आणि मागील हंगामातील थकीत ऊस बिले तातडीने अदा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

परतीच्या पावसासाठी कृत्रिम पावसाची प्रक्रिया राबवावी, खरीप पिकांचे ८५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा शास्त्रज्ञांचा संयुक्त अहवाल शासनाकडे पाठवावा, महिला व शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, विद्यार्थ्यांचे परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफ करावे आणि शेतकऱ्यांना दिवसा आठ तास अखंड वीज द्यावी, या मागण्याही करण्यात आल्या.

शेतीमालाला हमीभाव देणारा कायदा लागू करावा, भारत-अमेरिका कृषी करार रद्द करावा तसेच वन्यप्राणी व मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या शेती नुकसानीवर तातडीने उपाययोजना करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनादरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. मागण्या तातडीने मान्य न केल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. आंदोलनात परिसरातील शेतकरी, शेतमजूर व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा

Web Title: Yedshee farmers rasta roko demand dry drought declaration 50000 per hectare compensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Farmers Protest
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…
1

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
2

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
3

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
4

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.