सामाजिक कार्यकर्ते शंभूराजे साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंढे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत दुग्धाभिषेक केला. प्रशासनातील प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जनहिताची भूमिका यांचे प्रतीक म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
भेसळखोरांविरोधात कोणतीही तडजोड न करता सुरू असलेल्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मुंढे यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला असून, त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
आंदोलकांनी यावेळी साखर उद्योगातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी कायद्याचे उल्लंघन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे देयक थकविल्याचा आरोप करण्यात आला. अनेक कारखान्यांकडे ऊसबिले तसेच कामगारांच्या पगाराची थकबाकी असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या निशाण्यावर आता सेलिब्रिटी! भ्रामक जाहिरातींवर होणार कडक कारवाई
विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी नवीन गाळप हंगामाची तयारी सुरू केली असली तरी मागील हंगामातील ऊस उत्पादकांची देणी अद्याप दिलेली नाहीत. सध्याचे साखर आयुक्त केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्याचा आरोप करत, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची साखर आयुक्तपदी नियुक्ती झाल्यास थकीत रकमेच्या वसुलीला गती मिळेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला.
शासनाने शेतकरी हिताचा विचार करून तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करावी. उपस्थिती आबा साठे, पिंटू काशीद सचिन करळे, बालाजी खेडकर ,संदीप साठे, गौतम शिंदे ,सचिन वाघ, सुधीर वाळगड ,सतीश जमदाडे ,काका पाटील सह शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उपस्थिती
एफडीआयचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त दूधाविरोधात कठोर कारवाईचे पाऊल उचलणारे तुकाराम मुंढे यांच्याविषयी शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भेसळ रोखल्यामुळे शुद्ध दुधाला योग्य बाजारभाव मिळण्याची आशा बळावली असून, त्यातून शेतकऱ्यांच्या दुधाच्या दरात वाढ होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या वतीने तुकाराम मुंढे यांचा दूग्धाभिषेक करून सन्मान करण्यात आला. यावेळी एफडीआय आयुक्त म्हणून त्यांचा किमान तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यात यावा, जेणेकरून विभागातील कारभार अधिक स्वच्छ, पारदर्शक आणि जनहिताभिमुख होईल.
तसेच, पुढील काळात त्यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी, अशीही जोरदार मागणी करण्यात आली. मुंढे यांच्या कार्यपद्धतीमुळे साखर उद्योगातील गैरप्रकारांवर नियंत्रण राहील, कारखानदारांवर वचक निर्माण होईल, शेतकऱ्यांना उसाची बिले १५ दिवसांच्या आत मिळतील आणि सहकारी संस्था तसेच साखर कारखान्यांमध्ये पारदर्शक प्रशासनाची नवी संस्कृती रुजेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. “भेसळीवर प्रहार, शेतकऱ्यांचा आधार; म्हणूनच मुंढे साहेबांना दूधाचा अभिषेक आणि तीन वर्षांच्या कार्यकाळासह साखर आयुक्तपदाची मागणी”, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
भिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई






