Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Agriculture News: प्रतिकूल हवामानासह अळी आणि कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी वारंवार औषध फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. वाढत्या खर्चाचा परिणाम आगामी काळात तांदळाच्या दरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 21, 2026 | 03:03 PM
शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • भाताचा उत्पादन खर्च वाढला
  • तांदळाच्या दरवाढीची शक्यता
  • अळी, कडा करप्यामुळे चिंता…
  • प्रतिकूल हवामानाचा फटका
गजानन गिरी,मसूर: कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली परिसरात भात पिकावर सध्या पानावरील अळी कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात आणखी वाढ झाली आहे. पावसाची उघडझाप, त्यानंतर पडणारे कडक ऊन, वातावरणातील बदलामुळे भात पिकावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशके, बुरशीनाशकासाठी आवश्यक टॉनिकची फवारणी सुरू आहे.

कोपर्डे हवेली परिसरातील भाताला राज्यभर मागणी आहे, दर्जेदार तांदळाची बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. मात्र, यंदा भात लागवडीपासूनच उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. मजुरी, खते, औषधे, रोपांची लागवड, चिखलणी, मशागत, पाणी व्यवस्थापनासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यात आता किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढला आहे.

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

पानावरील अळी पानांच्या पाठीमागील बाजूस अंडी घालते. अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास पानांचे नुकसान होऊन पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कडा करपा रोगामुळे पानांच्या कडांपासून तपकिरी डाग पडून पाने करपण्यास सुरुवात होते. वेळेत नियंत्रण न केल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

प्रतिकूल हवामानामुळे काही ठिकाणी भात पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकरी पिकाची नियमित पाहणी करून आवश्यक फवारणी करत आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने आगामी काळात भात व तांदळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पावसाच्या अनिश्चिततेचा भातशेतीला फटका बसत असून पावसाअभावी भातपीक रोगाला बळी पडण्याची शक्यता वाढली आहे. पानांवर कडाकरपा आळी दिसून येत आहे. शिवारात किटक नाशक, बुरशीनाशक फवारण्या सुरू आहेत, अशी माहिती भात उत्पादक शेतकरी विक्रम चव्हाण यांनी दिली.

लागवडी, फवारणी बरोबर मजुरांचे वाढलेले दर जेरीस आणत आहेत. त्यातच उन पावसाच्या खेळामुळे भाताची वाढ खुंटली आहे. यंदा खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती आहे. भाताची वाढ खुंटली असून फुटवा देखील निघाला नाही. उत्पादन खर्च वाढल्यामुळे तांदूळ देखील महागणार, अशी माहिती भात उत्पादक शेतकरी महादेव चव्हाण यांनी दिली.

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू

Web Title: Paddy production cost rises due to adverse weather pest disease rice price hike likely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • agriculture
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
1

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
2

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
3

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती
4

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.