Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afghan Raisins Scam: अफगाण बेदाण्यामुळे तासगावचा द्राक्ष उद्योग संकटात; दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची तयारी

बैठकीत द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. पत्नी-मुलींचे दागिने विकून शेतकरी द्राक्षबागा वाचवत असताना काही व्यापारी शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट करत आहेत,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 04, 2026 | 03:49 PM
Afghan Raisins Scam: अफगाण बेदाण्यामुळे तासगावचा द्राक्ष उद्योग संकटात; दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची तयारी
Follow Us
Close
Follow Us:
  • अफगाणिस्तानातून आयात केलेला बेदाणा तासगावचा असल्याचे भासवून विक्री
  • अफगाण बेदाणा प्रकरणावरून व्यापाऱ्यांना जाब विचारण्यात आला
  • अफगाणिस्तानातून सुमारे १,७०० टन बेदाणा सांगली जिल्ह्यात दाखल
Tasgaon grape industry : अफगाणिस्तानातून आयात केलेला बेदाणा तासगावचा असल्याचे भासवून विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष व बेदाणा उद्योगाच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहिती तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती युवराज पाटील यांनी दिली.

तासगाव बाजार समितीच्या सभागृहात गुरुवारी द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समितीचे संचालक, व्यापारी व शेतकरी यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत अफगाण बेदाणा प्रकरणावरून व्यापाऱ्यांना जाब विचारण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी केली.

बैठकीस बेदाणा असोसिएशनचे अशोक बाफना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, बाजार समितीचे संचालक कुमार शेटे, महादेव पाटील, खंडू पवार, रेखा पाटील, प्रभारी सचिव चंद्रकांत कणसे यांच्यासह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी बेदाणा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते.

Nicolas Maduro : जर ट्रम्प करू शकतात, तर पंतप्रधान मोदी का नाही? असदुद्दीन ओवैसी असं का म्हणाले?

सभापती युवराज पाटील म्हणाले, काही व्यापारी अफगाण बेदाणा आणून त्यावर तासगावचे लेबल लावून विक्री करत आहेत. हा प्रकार केवळ फसवणूक नसून संपूर्ण द्राक्ष उद्योगाला उद‌्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे. अशा व्यापाऱ्यांवर बाजार समितीच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाईल. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तासगाव, सांगली व पंढरपूर बाजार समित्यांची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन केंद्रीय कृषिमंत्री आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या माध्यमातून अफगाण बेदाण्याच्या आयातीवर निर्बंध आणण्याबाबत चर्चा केली जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

शेतकरी आर. डी. पाटील यांनी बैठकीस गैरहजर राहिलेल्या संबंधित व्यापाऱ्यांवर व सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, संपूर्ण उद्योगाचा कणा शेतकरी आहे. बटेजा आणि बाफना यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आयात केलेला बेदाणा नेमका कुठे गेला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. यावेळी बेदाणा असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय बोथरा, सुदाम माळी, सतीश माळी, भूपाल पाटील, द्राक्ष बागायतदार संघाचे सुरेश करगणे, पृथ्वीराज शिंदे, जयसिंग चव्हाण, जितेंद्र पाटील, मोहन पाटील उपस्थित होते.

फार्महाऊसवर लपविला माल

बैठकीत द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. पत्नी-मुलींचे दागिने विकून शेतकरी द्राक्षबागा वाचवत असताना काही व्यापारी शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट करत आहेत, असा आरोप करण्यात आला. बाहेरचा माल विकण्यासाठी तासगावची बाजार समिती नाही. हा प्रकार म्हणजे मड्यावरच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा असल्याचे सांगत संताप व्यक्त करण्यात आला. अफगाण बेदाणा काही फार्महाऊसवर लपवून ठेवण्यात आल्याची माहिती व व्हिडीओ पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

MNS-Shiv Sena joint Manifesto:’शिक्षणापासून महिला सक्षमीकरणापर्यंत…’; ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध,

डीडीआरकडे अहवाल सादर होणार

तासगाव बाजार समितीने बुधवारी सभापती युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कोल्ड स्टोअरेजची तपासणी केली. या तपासणीत आढळलेल्या बाबींचा सविस्तर अहवाल डीडीआर यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

जिल्ह्यात १,७०० टन अफगाण बेदाणा

अफगाणिस्तानातून सुमारे १,७०० टन बेदाणा सांगली जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. हा साठा तासगावच्या बेदाण्याची बदनामी करत असून भविष्यात संपूर्ण उद्योगाला मोठा धोका निर्माण करू शकतो. हा साठा तातडीने जप्त करून कारवाई करावी, अन्यथा आरपारची लढाई केली जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

 

Web Title: Afghan raisins scam afghan raisins scam threatens tasgaon grape industry move to cancel licenses of guilty traders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Farmers News
  • Sangali News

संबंधित बातम्या

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न
1

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय
2

Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?
3

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन
4

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.