अमेरिकेच्या कारवाईवर असदुद्दीन ओवैसी यांनी नरेंद्र मोदींनी 26 11 मुंबई दहशतवाद्यावर कारवाई करण्याची मागणी केली (फोटो - सोशल मीडिया)
Nicolas Maduro : नवी दिल्ली : अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली. ज्या प्रकारे ही अटक करण्यात आली त्यावरून आता जागतिक राजकारण तापले आहे. व्हेनेझुएलाची राजधानी कराकसवर अमेरिकेने केलेली लष्करी कारवाई जगभरात चर्चेचा विषय आहे. भारतातही यावर चर्चा सुरू झाली आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हानही दिले. ज्याप्रमाणे ट्रम्पच्या सैन्याने व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचे अपहरण करून त्यांना अमेरिकेत नेले, तसे धाडस भारत का नाही दाखवू शकत असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.
AIMIM पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी मुंबईतील गोवंडी येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यादरम्यान ते म्हणाले, “आज आम्हाला ऐकायला मिळाले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सैन्याने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे त्यांच्या देशातून अपहरण करून त्यांना अमेरिकेत नेले.
हे देखील वाचा : देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू…”; उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
२६/११ च्या दहशतवादाल्या अटक करा – औवेसी
असदुद्दीन ओवैसी यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना घरात घुसून पकडावे असे मत मांडले आहे. ते पुढे म्हणाले की, “जर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करू शकतात, तर तुम्ही (पंतप्रधान मोदी) यांनीही पाकिस्तानात जाऊन २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना अटक करावी, मग तो मसूद अझहर असो किंवा लष्कर-ए-तोयबाचा क्रूर सैतान असो. जर तुमच्याकडे (नरेंद्र मोदी) ५६ इंचाची छाती असेल, तर त्यांना भारतात आणा.” अशी मागणी असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.
जर ट्रम्प हे करू शकतात, तर मोदी का करू शकत नाहीत? – ओवैसी
असदुद्दीन ओवैसी म्हणतात की, “जर डोनाल्ड ट्रम्प हे करू शकतात, तर तुम्ही कमी आहात का? जर ट्रम्प ते करू शकतात, तर तुम्हालाही ते करावे लागेल. कारण मोदी म्हणाले होते की यावेळी ट्रम्प सरकार असेल.”
हे देखील वाचा : अमेरिकेची गुंडगिरी! चीनच्या नाकाखालून मादुरोला उचललं; ड्रॅगनने व्यक्त केला तीव्र संताप
“मादुरोवर गुन्हेगारी आरोप दाखल केले जातील”
हे लक्षात घ्यावे की शनिवारी अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आणि व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केल्याचा दावा केला.
व्हेनेझुएलाचे अंतरिम अध्यक्ष नियुक्त
दरम्यान, व्हेनेझुएलातील सत्ता आणि सुरक्षेबाबत एक मोठी घडामोड घडली आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांची कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.






