Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vishalgad Curfew : शिवरायांचा हा किल्ला तब्बल सहा महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला; तहीही या असणार अटी

छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पराक्रमाचा साक्षीदारअसणाऱ्या विशाळगडावर गेल्या 5 महिन्यांची बंदी लागू करण्यात आली होती मात्र आता ही बंदी शिथील करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जाणून घ्या अधिक माहिती

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 17, 2025 | 12:14 PM
शिवरायांचा हा किल्ला तब्बल सहा महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला; तहीही या असणार अटी

शिवरायांचा हा किल्ला तब्बल सहा महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला; तहीही या असणार अटी

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पराक्रमाचा साक्षीदास असलेला विशाळगडावर गेल्या पाच महिन्यांपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. विशाळगडावरील ही संचारबंदी अखेर जिल्हा प्रशासनाने शिथिल केली आहे. याबाबतचा अध्यादेश जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जारी केला आहे. मात्र काही अटी आणि शर्तींचे पालन केलं तरचं पर्यटकांना किल्ले विशाळगडावर जाता येणार आहे.

Walmik Karad Property: वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ED थक्क, आकड्यात सांगायचं झालं तर 1500,000,00,00,000

नेमकं काय घडलं होतं?

विशाळगडावरील अनधिकृत बांधकामाविरोधात गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमींनी आवाज उठवला होता. यानंतर विशाळगड मुक्त करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन पुकारले होते. मात्र या आंदोलनाला गजापूर गावात हिंसक वळण लागल्यानंतर राज्य सरकारने विशाळगडावर संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता.

दरम्यान किल्ला पाच महिन्यांपासून बंद असल्यामुळे किल्ला आणि परिसरात गावांवर जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली होती. यामुळे चार-पाच दिवसांपूर्वी गडावरील नागरीकांनी संचारबंदी उठवण्याची मागणी करत धरणे आंदोलन केलं होतं. याची सरकारकने गंभीर्याने दखल घेत गडावरील संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे. पर्यटकच या आजूबाजूच्या गावांचा उत्पन्नाचं प्रमुख साधन आहेत.

काय आहेत नियम आणि अटी?

गडावरील जरी बंदी उठवण्यात आली तरी पर्यटकांना नियम आणि अटींचं पालून करावं लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही परवानगी देण्यात आली आहे. 31 जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत विशाळगडावर जाता येणार आहे. दरम्यान विशाळगडावर येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना विशाळगडावर सोडण्यात येणार आहे. तशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

Satya Nadella : मायक्रोसॉफ्ट भारतात AI मध्ये करणार इतक्या अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; सत्या नाडेलांनी केली मोठी घोषणा

विशाळगड जिल्हा प्रशासनाने 31 जानेवारीपर्यंत पर्यटकांना आणि देवदर्शनासाठी खुला करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र गडावर पर्यटकांना दहा ते पाच या वेळेतच सोडले जाणार आहे. कोणत्याही नागरिकांना सायंकाळी पाचनंतर गडावर मुक्काम करता येणार नाही. तसंच किल्ल्यावरील धार्मिक कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. दरम्यान किल्ले विशागडावर कोणालाही मासांहार पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत किंवा शिजवून खाता येणार नसल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

Web Title: After 5 months vishalgad lifted curfew for public and tourism kolhapur district administration decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 09:13 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaj Maharaj
  • Marathi News
  • Vishalgad Fort

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.