Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी OYO ची पेरेंट कंपनी Prism शेवटी शेअर बाजारात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने SEBI कडे ६,६५० कोटी रुपयांच्या IPO साठी आपले सुधारित मसुदा कागदपत्रे सादर केले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 01, 2026 | 05:52 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Prism IPO: सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे वर्चस्व आहे. अलीकडेच अनेक कंपन्यांनी IPO टप्प्यात प्रवेश केला आहे, ज्यामुळे लोकांना शेअर्स खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. आता, या स्पर्धेत आणखी एका कंपनीने उडी घेतली आहे: प्रिझम, एक हॉस्पिटॅलिटी टेक्नॉलॉजी कंपनी जी ओयोची मूळ कंपनी म्हणजे पॅरेंट कंपनी आहे ती देखील मैदानात उतरली आहे.

जूनमध्ये बंपर GST कलेक्शन, आकडा 1.94 लाख कोटींवर; महाराष्ट्र पुन्हा अव्वल स्थानी, आता वस्तू स्वस्त होतील की महागाई वाढेल?

Prism कंपनीची IPOमध्ये एन्ट्री

अलीकडील वृत्तांनुसार, OYO ची मूळ कंपनी, प्रिझम, आयपीओ बाजारात प्रवेश करण्याची योजना आखत आहे. ही हॉस्पिटॅलिटी, हॉटेल आणि रूम बुकिंग तंत्रज्ञान कंपनी जनतेला प्रथमच तिचे शेअर्स खरेदी करून भागधारक होण्याची संधी देणार आहे. कंपनीचे बाजारातून एकूण ₹६,६५० कोटी उभारण्याचे उद्दिष्ट आहे. या उद्देशाने, कंपनीने शेअर बाजार नियामक, सेबीकडे आपली नवीन कागदपत्रे सादर केली आहेत.

या आयपीओमधून मिळणारा संपूर्ण निधी कंपनीला जाणार आहे. हा संपूर्ण आयपीओ एक ‘फ्रेश इश्यू’ आहे, म्हणजेच कंपनी पूर्णपणे नवीन शेअर्स जारी करत आहे. यात कोणतीही OFS म्हणजेच ऑफर फॉर सेल नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की ओयोचे जुने गुंतवणूकदार जसे की संस्थापक रितेश अग्रवाल, सॉफ्टबँक, मायक्रोसॉफ्ट, एअरबीएनबी त्यांचे जुने शेअर्स विकत नाहीत. या आयपीओमधून मिळणारा सर्व निधी वैयक्तिक खिशात न जाता थेट ओयोला जाणार आहे.

कर्ज फेडण्याची मास्टरप्लॅन!

या आयपीओमधून मिळणाऱ्या निधीबाबत कंपनीची दोन प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे, कंपनी हा निधी आपले ₹४,९८७.५ कोटींचे कर्ज फेडण्यासाठी वापरेल. कोणतेही थकीत कर्ज प्रथम फेडले जाईल. यानंतर, उर्वरित निधीचा वापर दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी आणि कंपनीचा व्यवसाय वाढवण्यासाठी केला जाईल.

पण मुख्य आयपीओपूर्वी, कंपनी काही प्रमुख गुंतवणूकदारांकडून अंदाजे ₹१,३३० कोटी देखील उभारू शकते. जर असे झाले, तर सर्वसामान्यांसाठी असलेल्या आयपीओचा आकार कमी होईल. प्रिझमने डिसेंबर २०२५ मध्ये गोपनीयपणे आपली कागदपत्रे दाखल केली होती आणि आता त्याला सेबीची मंजुरी मिळाली आहे. याचा अर्थ कंपनी लवकरच आपला आयपीओ आणू शकते.

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जुलैपासून पगारात होणार मोठी वाढ; DA 3 टक्क्यांनी वाढणार

Web Title: Oyos parent company prism to launch 6650 crore ipo company has devised this major game plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Business News
  • Loan
  • Loan Issue
  • Marathi News
  • sebi
  • share market
  • tax

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.