मुंबई: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटण्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाची ठिणगी पडली आहे. या प्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पण त्यानंतर महायुतीत वादग्रस्त विधाने करण्यासाठी आता चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे संजय गायकवाड यांच्यानंतर आता खासदार अनिल बोंडे यांनीही राहुल गांधींविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संजय गायकवाडांनंतर भाजप खासदार अनिल बोंडेंनी ‘”राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा योग्य नाही. त्यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत,” असं खळबळजनक विधान केलं आहे. अनिल बोडे म्हणाले, “ संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची भाषा करणे योग्य नाही. परंतु, राहुल गांधी आरक्षणाबाबत जे बोलले, तेही भयानक आहे. परदेशात जाऊन कोणी काहीही बोलत असेल, तर जीभ त्याच्या जीभेला चटके दिले पाहिजेत. मग ते राहुल गांधी असोत, ज्ञानेश महाराव असोत वा श्याम मानव असोत. जे भारतातील बहुसंख्याक नागरिकांच्या भावना दुखावतात. त्यांना किमान जाणीव तरी करून दिली पाहिजे, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.अनिल बोंडे हे कायम त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा: हे ‘पंजा’चे निशाण थप्पड म्हणून काम करेल; जुलानातून विनेश फोगाट गरजली….
दरम्यान, अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत विधान केले होते. “देशात अनुकूल सामाजिक परिस्थिती निर्माण झाल्यावर आरक्षण रद्द करण्याचा विचार करता येऊ शकतो,” असं विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर भाजप, बहुजन समाज पक्ष, शिवसेना आणि भाजपच्या इतर काही मित्रपक्षांनीही राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली.
काय म्हणाले संजय गायकवाड?
लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात आहे, असा फेक नरेटिव्ह सेट करून राहुल गांधी आणि काँग्रेसने मते घेतली. पण आज ते आरक्षण संपविण्याची भाषा करायला लागेलत. 100 टक्के काँग्रेसला मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं आहे. पण असं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देईल,” असं विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं. “महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाची मागणी होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मागासवर्गीय, आदिवासी आणि अन्य प्रवर्गातील लोकांना आरक्षण दिले. पण, राहुल गांधींनी परदेशात जाऊन, ‘माझ्या देशातील आरक्षण संपवायचं असल्याचे विधानं केले. यातून काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. राहुल गांधींनी पोटातील मळमळ बाहेर ओकली.”
हेही वाचा: रोमान्स, ॲक्शन अन् कॉमेडी! सारा अलीच्या खात्यात आहेत हे चित्रपट, जाणून घ्या कधी होणार