Photo Credit- Social media
हरयाणा: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून तिने जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या तिकीटावरून ती हरयाणारातील जुलावा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. अशातच तिने काँग्रेसच्या चिन्हावरून तिने विरोधकांवर निशाणा साधत त्यांना आव्हान दिले आहे.
जुलाना मतदारसंघात आयोजित सभेत बोलताना तिथे विरोधकांवर निशाणा साधला आहे, उपस्थितांना संबोताना विनेश म्हणाली, ताई तुम्हाला माहिती आहे का माझे निवडणूक चिन्ह काय आहे. माझे निवडणूक चिन्ह ‘हाताचे’ (हाताचा पंजा) निशाण आहे. मतदान पेटीवर त्यावर तुम्हाला मतदान करायचे आहे. हे हाताचे विसरू नका, त्यावरच मतदान करा, ‘हाताचे निशाण थप्पड म्हणून काम करेल, 5 तारखेला ही थप्पड दिल्लीत दिली जाईल. गेल्या 10 वर्षात झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे.
हेही वाचा: ‘मला हसण्यासाठी पैसे मिळतात’, ‘द कपिल शर्मा शो’मधील अर्चना पूरण सिंहची फी जाणून व्हाल
दरम्यान, विनेश फोगटने 6 सप्टेंबर रोजी कुस्तीपटू बजरंग पुनियासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर काँग्रेसने विनेश यांना जुलाना येथून उमेदवारी दिली. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, दीपेंद्र सिंह हुड्डा आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांची भेट घेतली. विनेश फोगटची भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी, जेजेपीचे अमरजीत धांडा, आयएनएलडीचे सुरेंद्र लाथेर आणि आपच्या कविता दलाल यांच्याशी जुलानामध्ये लढत होणार आहे. विनेश फोगट जुलानामध्ये सतत प्रचार करत आहेत.विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंवर लैंगिक छळाचा आरोप करत निषेध केला होता.
जुलाना जागेचे जातीय समीकरण पाहिल्यास येथे 1.87 लाख मतदार आहेत. यापैकी सुमारे 70% जाट समाजाचे आहेत. जाट समाजानंतर ओबीसी आणि ब्राह्मण समाजाचे एकूण मतदार 50 हजाराच्या आसपास आहेत. विनेश फोगाट आणि काँग्रेससाठी अडचण अशी आहे की जर जाट मतदार विभागले गेले तर त्यांचा मार्ग कठीण होऊ शकतो कारण पाच प्रमुख पक्षांपैकी चार पक्षांचे उमेदवार जाट आहेत. आम आदमी पक्षाच्या उमेदवार कविता दलाल या मूळच्या जुलाना भागातील असून त्या सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहेत.
हेही वाचा: वाटीभर सीताफळाचा गर वापरून १० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा सीताफळ क्रीम