After Someshwars Jurisdiction Is Added To Malegaon The Ownership Rights Of The Original Members Will Be Compromised Chandrarao Taware And Ranjan Taware Narab
सोमेश्वरचे कार्यक्षेत्र ‘माळेगाव’ ला जोडल्यानंतर मुळ सभासदांच्या मालकी हक्कावर गदा येणार : चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांचा आरोप
माळेगाव कारखाना हा मुळ सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, सोमेश्वरचे सभासद व तेथील कार्यक्षेत्र माळेगावला जोडल्यानंतर माळेगावच्या मुळ सभासदांच्या मालकी हक्कावर गदा येऊ शकते, माळेगावमध्ये पुढील राजकारण ओळखून वरिष्ठ नेत्यांनी खोडसाळपणा चालू ठेवला आहे, असा आरोप माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रावर तावरे व रंजनकुमार तावरे यांनी करून करून याबाबत माळेगाव कारखान्याच्या सभासदा पर्यंत पोहोचून आम्ही जनजागृती करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
माळेगाव: माळेगाव कारखाना हा मुळ सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, सोमेश्वरचे सभासद व तेथील कार्यक्षेत्र माळेगावला जोडल्यानंतर माळेगावच्या मुळ सभासदांच्या मालकी हक्कावर गदा येऊ शकते, माळेगावमध्ये पुढील राजकारण ओळखून वरिष्ठ नेत्यांनी खोडसाळपणा चालू ठेवला आहे, असा आरोप माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रावर तावरे व रंजनकुमार तावरे यांनी करून करून याबाबत माळेगाव कारखान्याच्या सभासदा पर्यंत पोहोचून आम्ही जनजागृती करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी संचालक जी. बी. गावडे, माजी उपाध्यक्ष शशिकांत कोकरे, जवाहर इंगुले, चिंतामणी नवले, राजेश देवकाते, दादा झांबरे, संजय तावरे,प्रकाश सोरटे, युवराज तावरे, विश्वास जगताप, भालचंद्र देवकाते, विकास जगताप, रणजित खलाटे, अॅड. श्याम कोकरे, विठ्ठलराव देवकाते आदी उपस्थित होते
यावेळी तावरे म्हणाले की, कारखान्याच्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत १० गावे नव्याने जोडण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला होता. हा निर्णय घेताना सभासदांनी कडाडून विरोध केला होता. तरी देखील हा निर्णय संचालक मंडळाने आवाजी मतदानाने मंजूर केला होता. तरी सत्ताधारी संचालक मंडळाने खोटे प्रोसडिंग लिहिल्याचे सभासदांच्या निदर्शनास आले आहे. सोमेश्वरच्या हद्दीतील १० गावे माळेगाव कारखान्याला जोडण्याचा विषय गतवर्षीच्या वार्षिक सभेत मंजूर झाल्याचा खोटा उल्लेख या प्रोसडींगमध्ये झाला आहे.
संचालक मंडळाला साखर आयुक्तालयाने चपराक दिली असताना, कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १० गावे नव्यानं जोडण्याचा निर्णय माळेगावच्या संचालक मंडळानं आवाजी मतदानाने मंजूर केला होता. या निर्णयाला प्रादेशिक सह संचालकांनी स्थगिती दिली गेली. मी व रंजन तावरे यांनी १० गावे नव्यानं जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी साखर आयुक्तालायकडे केली होती.
वास्तविक गावे जोडण्याचा विषय माळेगावच्या सभासदांनी नामंजूर केला आहे. तशापद्धतीचे निरिक्षण साखर आयुक्त कार्यालयासह मुंबई उच्च न्यायालयानेही नोंदविले आहे. या गोष्टीला प्रतिकार करण्यासाठी आणि माळेगावच्या सत्ताधारी संचालक मंडळाच्या सभासदविरोधी कृतीला हाणून पाडण्यासाठी पुन्हा आम्ही शेतकऱ्यांच्या दारात जावून जनजागृती करू, असा इशारा माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी दिला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ३० सप्टेंबर रोजी आहे. त्या पार्श्वभूमिवर प्रशासनाने सभासदांना मागिल सभेचे ड्राफ प्रोसडिंग पाठविले आहे. त्या प्रोसडिंगमध्ये सोमेश्वरच्या हद्दीमधील १० गावे माळेगावला जोडण्याचा विषय बहुमताने मंजूर झाल्याचा उल्लेख केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेविरुद्ध तीव्र आक्षेप घेत माळेगावचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली. कोणत्याही परिस्थितीत सोमेश्वरची १० गावे माळेगावला घेता येणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती साखर कारखान्याच्या सभासदांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून संचालक निवडून आणले. परंतु त्या कारखान्याची आजची परिस्थिती पाहता हा कारखाना लवकरच कवडीमोल भावाने अजित पवार स्वतःच्या खिशात घालतील. पवार यांना सहकारातील कारखानदारी संपवून माळेगांवचा छत्रपती कारखाना करायचा आहे, असा आरोप चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी केला.
रंजन तावरे म्हणाले,” नुकतेच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये १० गावे जोडण्याच्या विषयाकडे मी व विरोधी संचालकांनी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले होते. तसेच माळेगावच्या कार्यक्षेत्रात नविन गावे सामाविष्ठ करू नयेत, सभासदांनी हा विषय मागिल वर्षीच्या सभेत पुर्णतः नामंजूर केला आहे.
तसा निरीक्षकांचा अहवाल साखर आयुक्त कार्यालयानेही कारखाना प्रशासना दिला आहे, असे असतानाही माळेगावच्या प्रशासनाने यंदाच्या ड्राफ प्रोसडिंगमध्ये १० गावे जोडण्याचा विषय बहुमताने मंजूर झाला आहे, असा उल्लेख केला. अर्थात त्यांची खोडसाळपणाची वृत्ती आगामी वार्षिक सभेत सभासद ठेचून काढतील,” असा इशारा त्यांनी दिला.
देशात, राज्यात इथेनॉलला अधिकची मागणी आहे. अधिकचे पैसे मिळवून देण्यारा हा व्यवसाय आहे. असे असताना माळेगावने इथेनॉल प्रकल्प विस्तारिकरणाला कमालीचा उशीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसान झाले. वास्तविक हा विषय आता आगामी वार्षिक सभेपुढे ठेवला आहे. हा प्रकल्प नव्याने होताना चार ते पाच लाख लिटर क्षमतेचा व्हावा, असे आवाहन चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी केले.
Web Title: After someshwars jurisdiction is added to malegaon the ownership rights of the original members will be compromised chandrarao taware and ranjan taware narab