Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलापूरच्या घटनेनंतर नाना पटोले आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी

बदलापूरच्या दोन चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 22, 2024 | 11:26 AM
बदलापूरच्या घटनेनंतर नाना पटोले आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बदलापूरमध्ये झालेला प्रकार अत्यंत संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. पीडित कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये दिलेली वागणूकही अत्यंत चीड आणणारी होती, पीडित कुटुंबालाच पोलिसांनी पुरावे मागितले यावरून शाळा व्यवस्थापनाला वाचवण्यासाठी शासनातील कोणाचातरी दबाव होता हे स्पष्ट होत आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्यांवर एवढा भयावह प्रसंग ओढवला त्याकडे गांभिर्याने व संवेदनशिलतेने पाहून तात्काळ कारवाई केली पाहिजे होती पण हे सरकार भावनाशून्य व गेंड्याच्या कातडीचे आहे. बदलापूरच्या दोन चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बदलापूर पोलीस स्टेशनला जाऊन ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व इतर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली व आरोपींवर जलदगती कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर कठोर शासन करण्यासंदर्भात पावले उचलावीत या मागणीचे निवेदनही दिले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे आणि महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बदलापूरची शाळा भाजपाचे चेतन आपटे यांची असल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा व शिंदे सेनेला सत्तेचा एवढा माज आहे की, हजारो लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले असताना त्यांना भाडोत्री लोक म्हणण्याची हिम्मत सत्ताधारी पक्षाचा आमदार करतो तर सत्ताधारी पक्षाचा माजी नगराध्यक्ष वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराला अत्यंत खालच्या पातळीवर बोलतो, हा सत्तेचा माज आहे, ही हुकूमशाही प्रवृत्ती आहे. हजारो लोकांनी आंदोलन केले त्यातील काही लोकांना अटक केली, आता २४ तारखेला मविआचा महाराष्ट्र बंद आहे, हजारो लोक त्यात सहभागी होतील सरकारमध्ये हिम्मत असेल तर सर्वांना जेलमध्ये टाका, बघू सरकार किती लोकांना जेलमध्ये टाकते, असे पटोले म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने केलेल्या शक्ती कायद्याला अद्याप राष्ट्रपतींनी मंजुरी दिली नाही. केंद्र सरकारने याबाबतीत पाठपुरावा केला पाहिजे होता. पण ते होताना दिसत नाही. शक्ती कायदा लागू झाल्यावर अशा प्रकरणात गुन्हेगारांना वेळेवर कठोर शिक्षा होईल आणि त्यांच्यावर जरब बसेल पण सरकारला याचे गांभीर्य नाही. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो शाळाचालक भाजपचा नेता आहे आणि सरकारने लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार उज्वल निकम यांची या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे ते पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी भाजप नेत्याला पाठीशी घालतील अशी शंका आहे, त्यामुळे या प्रकारणाची निष्पक्ष चौकशी करून पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी एसआयटी प्रमुख व विशेष सरकारी बदलून दुसऱ्या निष्पक्ष वकील आणि पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.

गेल्या १० वर्षात राज्यात पन्नास हजारांहून अधिक महिलांवर आणि वीस हजारांहून अधिक अल्पवयीन बालिकांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत पण सरकार त्या रोखण्यासाठी काहीच उपाययोजना करत नाही. बदलापूरमध्ये एवढा गंभीर गुन्हा घडला असतानाही राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री विरोधकांवर आरोप करत आंदोलन राजकीय होते असा आरोप करतात. या आंदोलनात कोणताही पक्ष वा नेता नव्हता. हे जनतेचे उस्फूर्त आंदोलन होते तरीही सत्ताधारी जे बोलत आहेत यातून या लोकांची सत्तापिपासू वृत्ती दिसून येते. महाभ्रष्ट युती सरकारच्या कारभाराने त्यांना तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Web Title: After the badlapur incident nana patole became aggressive nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 11:26 AM

Topics:  

  • Badlapur case
  • BJP
  • Congress
  • maharashtra
  • Nana patole

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
4

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.