मोठ्या यशानंतर CM शिंदेंची हात जोडत पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अडीच वर्ष...
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून भाजपने आपली आघाडी कायम ठेवली आहे. सध्या समोर येत असलेल्या कलांनुसार, भाजप आणि महायुती ही आघाडीवर आहे. मीडिया रिपोर्टनुसार महायुती ही तब्बल 217 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान महायुतीची राज्यात यशाकडे वाटचाल सुरु आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे नेमकं काय म्हणाले?
“मनापासून काम केलं म्हणून हा एवढा मोठा विजय मिळाला आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अगदी हात जोडून मतदारांचे आभार मानले. “जनतेनं भरभरुन महायुतीला मतदान केलं. गेले अडीच वर्ष महायुतीने जे काम केलं त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेनं दिली. म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो, त्याचे धन्यवाद देतो,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच पुढे बोलताना एकनाथ शिंदेंनी, “जे काम आम्ही अडीच वर्षात केलं. त्याची नोंद घेत कामाची पोचपावती आम्हाला दिलेली आहे,” असंही या निकालावर भाष्य करताना शिंदेंनी म्हटलं आहे.
हे सुद्धा वाचा : 200 रूपयांची लाच घेणं भोवलं; ‘या’ बड्या अधिकाऱ्याला थेट 6 वर्ष…
“आम्ही अडीच वर्षात जे काम केलं त्यापेक्षा आता पुढील कार्यकाळात आमची जबाबदारी वाढली आहे,” असं सांगताना एकनाथ शिंदेंनी महायुती अधिक जोमाने काम करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. “मी जनतेला त्रिवार वंदन करतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. सर्व मनापासून काम करत होते. म्हणून एवढा मोठा विजय मिळतोय. मी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाच्या मतदारांना धन्यवाद देतो. त्यांनी मला मोठ्या लीडने निवडून दिलं आहे. सर्व मतदारांचे मी आभार मानतो,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.