सौजन्य - सोशल मिडीया
धाराशिव : मराठवाड्यातील धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिव शहरातील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील दुकाने निरिक्षक विवेक वासुदेव हेडाऊ यांना लाचखोरी प्रकरणी धाराशिवच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने 6 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दुकानाचा परवाना नुतनीकरण करण्यासाठी 200 रूपयांची लाच घेणं हेडाऊ यांना यांना महागात पडलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
विवेक वासुदेव हेडाऊ हे दुकाने निरीक्षक सरकारी कामगार अधिकारी कार्यालय धाराशिव इथे कार्यरत होते. राज ऑफसेट व स्टेशनरी सप्लायर्स यांच्या दुकानाच्या परवान्याचे नुतनीकरण करायचे होते. त्यासाठी ते हेडाऊ यांच्याकडे गेले होते. विवेक हेडाऊ यांच्याकडे दुकानाचा परवाना नुकनीकरणाचे अधिकार होते. त्यांनी यावेळी संबधीत दुकानदाराकडे 200 रूपये लाचेची मागणी केली. त्यानंतर त्यांनी ते 200 रूपये स्विकारले. त्यानंतर ते ठेवण्यासाठी कार्यालयातील लेखनिक दत्तात्रय आनंदराव दाने याच्याकडे दिले.
हा सर्व प्रकारच लाचलूचपत प्रतिबंध अधिकाऱ्यांसमोरच घडला. त्यांनी त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी या दोघांवरही घटना दाखल करण्यात आला. त्याचा निकाल आता न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी विवेक वासुदेव हेडाऊ या अधिकाऱ्याला दोन वेगवेगळ्या कलमा खाली कोर्टाने 3-3 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अशी सहा वर्षाची संयुक्त शिक्षा आता त्यांना भोगावी लागणार आहे. त्याच बरोबर दोन हजाराचा दंडही ठोठावला आहे.
दंड न भरल्यास एक महिन्याचा कारावास सोसावा लागणार आहे. दरम्यान या प्रकरणातील दुसरा आरोपी लेखनिक दत्तात्रय याची मात्र निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर लोकांनी जागृत व्हावे. जर कोणी अधिकारी कर्मचारी सरकारी कामासाठी पैशाची मागणी करत असेल तर त्याची तातडीने तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केली आहे.
दोन लाखांची लाच घेताना पकडले
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली महावितरणच्या बंडगार्डन विभागातील कार्यकारी अभियंत्याला दोन लाख रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंहेगात पकडले. प्रलंबित असलेल्या ५ फाईलवर कार्यवाही करण्यासाठी तसेच मांजरी येथील नवीन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीज भार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून अभियंत्याने ५ लाख रुपयांची लाचेची मागणी करुन त्यापैकी २ लाख रुपये घेतले आहेत. भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत (वय ५१) असे या कार्यकारी अभियंताचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. याबाबत एका विद्युत ठेकेदाराने तक्रार केली होती.