Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers News: शेतकरी संकटात! जंगली हत्तींसह वाघांची दहशत; खरिपानंतर आता रब्बी हंगामही धोक्यात

Gadchiroli the Rabi season : आधी अवकाळी पावसामुळे धोका, आता जंगली प्राण्यांमुळे शेतकरी संकटात पाहायला मिळत आहे. गडचिरोत पाचही वनविभागात जंगली प्राण्यांनी दहशत मांडून ठेवली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 29, 2025 | 04:04 PM
अवघ्या चार महिन्यात १०२ शेतकरी आत्महत्या

अवघ्या चार महिन्यात १०२ शेतकरी आत्महत्या

Follow Us
Follow Us:
  • जंगली हत्ती आणि वाघांच्या दहशतीमुळे शेतकरी संकटात
  • खरिपानंतर आता रब्बी हंगामही धोक्यात
  • पाचही वनविभागांत वाघांनी प्रचंड दहशत निर्माण
गडचिरोली: चार वर्षापूर्वी ओडिशातून आलेल्या जंगली हत्तींनी जिल्हावासींना हैराण करून सोडले होते. हत्ती कधी दक्षिण गडचिरोली तर कधी मध्य व उत्तर गडचिरोलीत फेरफटका मारत आहेत. यासोबतच गडचिरोली वनवृत्ताच्या पाचही वनविभागांत वाघांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे. क्वचितप्रसंगी वाघाचे दर्शन होणाऱ्या भागात ‘पगमार्क’ दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खरिपासह रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

‘दुष्काळात तेरावा महिना’! आधी अतिवृष्टी, त्यात खत दरवाढीने शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

मागील तीन चार वर्षांपूर्वी – ओडिशा राज्यातून छत्तीसगडमार्गे जंगली हत्तींनी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यात प्रवेश केला. त्यानंतर त्या हत्तींच्या कळपाने कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी तालुक्यांत बरेच दिवस बस्तान मांडले होते. त्यानंतर त्यांनी गडचिरोली व आरमोरी तालुक्यांच्या सीमावर्ती भागात मागील वर्षभरापासून मुक्काम ठोकला होता. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील खरिपासह रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रात्रीच्या सुमारास हत्तींकडून नुकसान तर पिकांच्या संरक्षणासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर दिवसा वाघांचे हल्ले होऊ लागल्यामुळे पिकांचे संरक्षण तरी कसे करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. दरम्यानच्या काळात गडचिरोली तालुक्यात मुक्कामी असलेल्या हत्तींनी चामोर्शी, एटापल्ली व भामरागड तालुक्यात भरमंती केली.

अल्पावधीतच हत्तींच्या कळपाने परत आपला मोर्चा गडचिरोली तालुक्याकडे वळविला. मात्र, हत्तींनी गडचिरोली तालुका सोडताच वाघांचे दर्शन होऊ लागले होते. त्यामुळे ‘हत्ती गेले की वाघ व वाघ गेले की हत्ती’ अशी स्थिती गडचिरोलीसह अनेक तालुक्याची झाली आहे. सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असून, रब्बी हंगामासाठी पूर्वमशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, जिल्ह्यात वाढलेल्या वन्यप्राण्यांमुळे शेती करायची तरी कशी? अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

तीन तालुक्यात वाघांची भीती, नागरिकांमध्ये संताप

जिल्ह्याध्या आरमोरी, देसाईगंज व गडचिरोली तालुक्यात वाघांचे दर्शन नेहमी होत होते. क्वचितच चामोर्शी तालुक्यात वाघाचे दर्शन हायचे. मात्र, मागील काही दिवसांपासून चामोशी तालुक्यासह मुलचेरा तालुक्यातही वाधांचे दर्शन होऊ लागल्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून नागरिकांना सतर्क केले जात असले तरी वाघांची दहशत कायम असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांचे ई-केवायसीकडे दुर्लक्ष; मराठवाड्यात ६.७८ लाख शेतकरी बाकी

 

Web Title: After the kharif season in gadchiroli the rabi season is also at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 04:04 PM

Topics:  

  • Farmers
  • Gadchiroli
  • maharashtra

संबंधित बातम्या

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!
1

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
2

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
3

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.