
Duplicate Voters Allegation:
Ahilayanagar Municipal Corporation voter list: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.असे असतानाच मतदार यादीतील घोळही पुन्हा उघडकीस येऊ लागले आहेत. अहिल्यानगर शहरातील महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घुसवलेले मतदार, दुबार मतदार हे राजकीय कट आहे. पण अहिल्यनगरमधील जनतेच्या हक्काच्या मतदानावर आपण गदा येऊ देनार नाही, स्थानिक प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसले असले तरी आम्ही त्यांच्या मानगुटीवर उभे राहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या पक्षाचे शहाध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिला आहे.
मतदार याद्यांमध्ये ४३७१ मतदार श्रीगोंद्याचे नाव असून, तसेच १०६८९ दुबार मतदारांची नावे आहेत. या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे, त्यावर आम्ही हरकती घेतल्या आहेत. १० तारखेपर्यंत आम्ही पाहू, नाहीतर या अनियमिततेविरोधात आम्ही न्यायालयीन लढा उभारू, असा इशाहारी अभिषेक कळमकर यांनी दिला आहे. अहिल्यानगर महापालिका मतदार याद्यांमध्ये एकाच पत्त्यावर १०० ते १५० मतदारांच्या नावापुढे पुरूषांचे लिंग स्त्री आणि स्त्रीचे लिंग पुरुष असे नोंदवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर एकाच नावापुढे वेगवेगळे फोटो तीन महिला मतदांच्या फोटोसमोर एकच नाव आहे. अनेक मतदारांच्या नावापुढे पत्ता आणि वास्तव्याची कोणतीही नोंद दिसत नाही. मतदार याद्यांमध्ये बाहेर गावचे मतदारांची नावेही घुसवण्यात आली आहेत. मतदार याद्यांमध्ये खूप मोठी फेरफार केली आहे, हा राजकीय कटच आहे, असा आरोप कळमकर यांनी केला आहे.
अहिल्यानगर महापालिका शहरातील मतदार यादीत थेट श्रीगोंद्यातील मतदारांचा समावेश केला आहे. अहिल्यानगरमधील मतदार यादीत श्रीगोंद्यातील ४३७१ मतदार जोडण्यात आले आहेत. कोणतीही माहिती किंवा कारणे न देता अहिल्यानगर शहर मतदारसंघाच्या यादीत ही नावे जोडण्यात आली आहेत. मया मतदारांना डबल स्टार केलं जाणार का, असा सवालही कळमकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, १०६८९दुबार नावांचे काय कऱणार, यवर काय कार्यवाही करणार, असे प्रश्नही अभिषेक कळमकर यांनी उपस्थित केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या (Election Commission) नियमावलीत हा विरोधाभास हास्यास्पद आहेत, “दुबार नाव वगळता येत नाही”, “मतदार याद्यांमध्ये दुबार नाव असणे हा गुन्हा आहे”, याकडेही कळमकर यांनी लक्ष वेधले आहेत. मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार असतील, तर गुन्हेगार कोण? सामान्य प्रामाणिक नागरिक? की यादी बिघडवणारे प्रशासन? असे प्रश्न कळमकरांनी उपस्थित केले.
मतदार याद्यांतील गंभीर विसंगतींचा निषेध करत अभिषेक कळमकर यांनी निवडणूक व्यवस्थेवर कठोर टीका केली. “IT क्षेत्रात भारत जगात आघाडीवर असताना, निवडणूक आयोगाकडे Auto-Updation प्रणाली का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदार याद्या अजूनही हाताने तपासल्या जात असल्याचे नमूद करत, तंत्रज्ञान प्रगती असूनही निवडणूक प्रक्रिया मागे असल्याची ही चिंताजनक बाब असल्याचे ते म्हणाले.योद् प्रणाली नसल्याने मृत, स्थलांतरित, लिंग बदललेले किंवा फोटो बदललेले मतदार यादीत कायम राहतात, आणि ही विसंगती नागरिकांना “बळीचा बकरा” बनवते. असंही कळमकर यांनी म्हटले आहे.
अमेरिकन राजकारणातील ‘जेरीमैंडरिंग’ संकल्पनेचा उल्लेख करत कळमकर म्हणाले की, अहिल्यानगरमध्ये मतदारसंघांची कृत्रिम फेररचना करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयुक्तांवर दडपण टाकून प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांच्या मनाप्रमाणे बदलून घेण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पुढे होऊ घातलेल्या Delimitation प्रक्रियेलाही हा धोका संभवतो, असेही कळमकर यांनी म्हटले आहे.