Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane crash conspircy: अजितदादांच्या विमानात सुसाईड बॉम्बर; अमोल मिटकरींचा पुन्हा गंभीर आरोप

आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर पक्षातील प्रत्येक कार्यकत्यांचेही हेच मत आहे. त्यामुळे प्रस्ताव आला तर विचार करू, अशी भाषा वापरणे हे पक्षाच्या भावनाना धक्का देणारे आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 09, 2026 | 01:02 PM
Ajit Pawar Plane crash conspircy: अजितदादांच्या विमानात सुसाईड बॉम्बर; अमोल मिटकरींचा पुन्हा गंभीर आरोप
Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत अमोल मिटकरींना शंका
  • व्हीएसआर विमानाचे पायलट दोन वेळा बदलले गेले
  • प्रत्येक पायलटचा ५० कोटी रुपयाचा विमा
Mumbai Politics: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. मात्र, रविवारी त्यांनी या सगळ्याचा कळस गाठत अजित पवार यांना मारण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बर अर्थात आत्मघातकी बॉम्बरचा वापर झाला असावा का, अशी शंका बोलून दाखवली आहे. एवढेच नव्हे अजित पवार यांच्या विमानाचे पायलट सुमित कपूर यांना संमोहित केले होते का, असा सवालही अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. अमोल मिटकरी यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला.

अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या व्हीएसआर कंपनीचे पायलट दोन वेळा बदलले गेले. ती कंपनी आधीच नादुरुस्त होती, वर्षभरापासून कंपनीवर बंदी होती आणि तेच विमान अजितदादांसाठी २८ तारखेला देण्यात आले, असे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात ? भाजप आणि शिंदेसेनेच्या बड्या नेत्यांनी डिवचलं

५० कोटींचा विमा : कंपनीवर शंका

दुसरीकडे डिसेंबर २०२५ च्या महिन्यात व्हीएसआर कंपनीने आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा ५० कोटी रुपयाचा विमा कंपनीने उतरवला होता. पायलेटने मेडे-मेडे कॉल दिला नाही. टेक ऑफ घेऊन काही वेळातच पुणे कव्हर करता आले असते, मात्र, पायलटने ते केले नाही. त्यामुळे आम्हाला मोठी शंका व्हीएसआर कंपनीवर आहे. ५० कोटींचा विमा काढून त्यांनी पायलटला हे कृत्य करा लावले का? याचा सुद्धा तपास झाला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितल्याचेही अमोल मिटकरी यांनी सांगितले. पायलटला हिप्नोटाईज केले होते का?, त्याला आमिष दाखवले होत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Maharashtra Politics)

“अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणात कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्रसह देशाचे लक्ष आहे. मला अपेक्षा आहे १० तारखेच्या पत्रकार परिषदमध्ये अनेक गोष्टी कव्हर होतील. जे काही पुरावे त्यांच्याकडे असतील ते सादर करतील, त्यामुळेच रोहित पवारांची पत्रकार परिषद पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.” अमोल मिटकरी, आमदार

ZP Election Results : साताऱ्यात भाजप आघाडीवर तर राष्ट्रवादी 14 जागांवर…; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

चाकणकरांनाही सुनावले खडेबोल

मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना खडेबोल सुनावले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत विचार केला जाईल’ असे वक्तव्य केल्यावरून अमोल मिटकरी यांनी चाकणकरांचा समाचार घेतला. ‘सुनेत्रा पवार याच अजित पवार यांच्या खऱ्या राजकीय उत्तराधिकारी आहेत. त्याच्याशिवाय दुसरा कोणताही त्या जागेवर विचार होऊ शकत नाही. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर पक्षातील प्रत्येक कार्यकत्यांचेही हेच मत आहे. त्यामुळे प्रस्ताव आला तर विचार करू, अशी भाषा वापरणे हे पक्षाच्या भावनाना धक्का देणारे आहे.

अजितदादांच्या मृत्यूचे भांडवल- हाके यांचा मिटकरींवर घणाघात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून रोज नवनवीन आरोप होऊन लागल्यानंतर रविवारी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या विषयावर जोरदार टोलेबाजी केली. अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर कोण विमानात बॉम्ब ठेवला म्हणतो, कोण आत्मघातकी हल्ला म्हणतो, हा सर्व प्रकार अजितदादांच्या मृत्यूचे भांडवल करून स्वतःचे अस्तित्व ठेवण्याची तडफड असल्याचा टोला हाके यांनी लगावला. अमोल मिटकरी याला फक्त भुंकण्यासाठी अजितदादांनी आमदार केले होते. त्याचे कर्तुत्व म्हणजे अजितदादांच्या चपल्या उचलणे एवढेच होते. आता अजितदादाही राहिले नाहीत आणि त्यांची आमदारकीही संपत आलेली असताना अस्तित्व टिकवण्यासाठी ही केविलवाणी धडपड केली जात असल्याचा टोलाही हाके यांनी लगावला.

Maharashtra EVM Controversy: ढाब्यावर सापडलेल्या ‘त्या‌’ दोन राखीव ईव्हीएम प्रकरणावर निवडणूक

 

पुरावे असतील तर तपास यंत्रणांकडे द्या!

मिटकरींकडे कुठली पुरावे असतील तर त्यांनी तातडीने पोलिसांना किंवा तपास यंत्रणा यांच्याकडे देणे गरजेचे आहे. नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि कोणावर विश्वास नसेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत. त्यांच्याकडे पुरावे द्यावेत. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी केविलवाणी धडपड करू नये, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

 

Web Title: Ajit pawar plane crash conspiracy a suicide bomber was on ajit dadas plane amol mitkari makes the allegation again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Maharashtra Politics
  • NCP Politics

संबंधित बातम्या

Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
1

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Breaking News Updates Today:  राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा
2

Maharashtra Breaking News Updates Today: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल
3

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल

Maharashtra Politics: सचिन अहिर नंतर आता ‘हा’ आमदार फुटण्याची चर्चा, ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं, आदित्यंचं काय होणार?
4

Maharashtra Politics: सचिन अहिर नंतर आता ‘हा’ आमदार फुटण्याची चर्चा, ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं, आदित्यंचं काय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.