Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: आमदार सत्यजित तांबेना भाजपात घेण्याचा विचार? मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी सुनावले

आमदार सत्यजित तांबे यांच्याबाबत सतत उजवा कौल बाळगणाऱ्या भाजपाच्या प्रदेशस्तरावरील पदाधिकाऱ्यांना संगमनेरमध्ये भाजपाच्या निष्ठावंतांनी चांगलेच सुनावले.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 15, 2026 | 08:18 PM
आमदार सत्यजित तांबेना भाजपात घेण्याचा विचार? मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले

आमदार सत्यजित तांबेना भाजपात घेण्याचा विचार? मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले

Follow Us
Follow Us:

आमदार सत्यजित तांबे यांच्याबाबत भाजपाच्या प्रदेशस्तरावरील काही पदाधिकाऱ्यांचा सकारात्मक कल असल्याची चर्चा सुरू असतानाच, संगमनेरमध्ये भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांमधील असंतोषाचा सूर लक्षात घेत अखेर पदाधिकाऱ्यांना हा विषय मागे घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे सत्यजित तांबे यांना भाजपात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत का, अशी चर्चा पक्षांतर्गतच रंगू लागली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी भाजपाचे मुंबई येथील पदाधिकारी संगमनेरमध्ये आले होते. या बैठकीत भाजपाचे समन्वयक मधुसूदन जाधव आणि ओंकार पाटील उपस्थित होते. बैठकीला बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख तसेच स्थानिक पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संगमनेर तालुक्यातील संघटनात्मक स्थिती, निवडणुकीतील अनुभव आणि पुढील रणनीती यावर चर्चा झाली.

खासदार राहुल गांधींच्या ‘चाय पार्टी’चा साताऱ्यात भाजपकडून निषेध; पोवई नाक्यावर जोरदार घोषणाबाजी

बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कामकाजाबाबत मार्गदर्शन केल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. त्यावेळी संगमनेर नगरपालिका निवडणुकीतील घडामोडींचा आढावा घेताना काही कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रतिनिधी आम्हाला विश्वासात घेत नसल्याची तक्रार केली. याचबरोबर आमदार सत्यजित तांबे यांच्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. “ज्यांच्याविरोधात आम्ही मैदानात उतरतो, त्यांनाच जर पक्षाचे काही पदाधिकारी सहकार्य करत असतील, तर आमच्या संघर्षाचे काय?” असा थेट सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्याचे समजते.

पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण

मुंबईहून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजित तांबे यांच्याबद्दल स्थानिक कार्यकर्त्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याने, त्यांना भाजपमध्ये घेण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा पक्षातच रंगू लागली आहे. याच शक्यतेचा अंदाज आल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बैठकीत जोरदार विरोध नोंदवल्याचे सांगितले जाते.

भाजपाचे वरिष्ठ नेते दखल घेणार का?

सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्याने निवडून आले होते. मात्र, त्यांचे राजकारण काँग्रेस आणि नंतर स्थापन झालेल्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या माध्यमातून सुरू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. काँग्रेस नेत्यांच्या फ्लेक्सवर दिसणारे त्यांचे फोटो, तसेच स्थानिक राजकीय हालचाली याची भाजपाचे वरिष्ठ नेते दखल घेणार का, असा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला.

Nashik News : नाशिककरांना मार्च महिन्यातच पाणी टंचाई; १३ टँकरद्वारे करावा लागतोय पाणी पुरवठा

मोदींच्या पोस्टरप्रकरणाची आठवण

काही कार्यकर्त्यांनी आमदार तांबे आणि भाजपातील काही पदाधिकाऱ्यांमध्ये वाढलेल्या जवळिकीबाबतही नाराजी व्यक्त केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासल्याच्या जुन्या प्रकरणाचीही आठवण करून देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांच्याबाबत कोणताही निर्णय घेताना पक्षाने सावध भूमिका घ्यावी, अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केल्याचे समजते. याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असेही बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती आहे.

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप

स्थानिक कार्यकर्त्यांनी असा आरोपही केला की, सत्यजित तांबे हे सातत्याने आपण मुख्यमंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या जवळ असल्याचे चित्र उभे करत आहेत. त्यामुळे शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. नगरपालिका निवडणुकीतही अशाच प्रकारचा संदेश मतदारांपर्यंत गेला, असा दावा कार्यकर्त्यांनी केला. काही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हाताशी धरून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे भाजप उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, अशी बाबही बैठकीत वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे समजते.

Web Title: Ahilyanagar news bjp sangamner critisize mumbai bjp leaders on mla satyajit tambe joining bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Sangamner
  • Satyajeet Tambe

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News : आधी दुकानदाराला बेदम मारहाण, मग थेट पोलिसांनाच दमदाटी!
1

Ahilyanagar Crime News : आधी दुकानदाराला बेदम मारहाण, मग थेट पोलिसांनाच दमदाटी!

Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, 200 ग्रामस्थ अडकले
2

Ahilyanagar News: भीमा नदीला महापूर; श्रीगोंद्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, 200 ग्रामस्थ अडकले

Ahilyanagar News : विजेच्या खांबाला हात लागल्याने साडेतीन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू!
3

Ahilyanagar News : विजेच्या खांबाला हात लागल्याने साडेतीन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू!

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न
4

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.