(फोटो सौजन्य-AI)
मार्च महिन्यातच सध्या नाशिकमध्ये पाण्याचा तुडवडा भासत आहे. त्यामुळे मार्चमध्येच टँकरचा आधार घ्यावा लागतो आहे. सध्या एकून 13 पाणी टँकर कार्यरत आहे. त्यात स्वतः महापालिकेच्या मालकीचे एकून ६ टँकर आहेत. हे टँकर पुरेसे नाहीत त्यामुळे इतर टँकरचाही आधार घ्यावा लागतो आहे. या टँकरांव्यतिरिक्त ठेकेदारांकडील 6 टँकर्सकडून पाणी पुरवठा केला जात आहे.
धरणांमध्ये पाणी साठा मुबलक असूनही पाण्याची ओरड होतांना दिसत आहे. विशेष महासभेत तर पाण्यावरूनच नगरसेवकांनी प्रशासनाला घेरत पुरेसा पाणी पुरवठा कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र सिंहस्थाची सुरू असलेली कामे पाहता अजुन किमान सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी त्यासाठी लागू
शकतो. महापालिकेच्या माध्यमातून टैंकरव्दारे पाणी पुरवठा केला जातो मात्र ही संख्या अत्यल्प असल्याने नागरिकांना पाणीच मिळत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी करत प्रत्येक प्रभागासाठी किमान एक पाण्याचा टैंकर द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार महापौरांनी पुरेसे टैंकर उपलब्ध करून द्यावेत.
महापालिकेच्या सहाही विभागाच्या कार्यालयांच्या ठिकाणी २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यामुळे टँकर भरण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याने मागेल त्याला पाणी उपलब्ध करून दिले जात असल्याचे धारणकर यांनी सांगितले. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. सहा ते दहा हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टैंकर आहेत. गरज पडल्यास टँकरची संख्या वाढविण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
कौतुकास्पद ! विद्यार्थ्याने अपघातानंतर चक्क रुग्णवाहिकेतून दिला दहावीचा पेपर; अडचणींवर केली मात






