
“फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप, पण…”; Indigo च्या सावळ्या गोंधळावर अमोल कोल्हे भडकले
सर्व स्ट्रॉग रूम भोवती सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांचे लाईव्ह सक्रिनवर पाहण्याची सुविधा आहे. उमेदवार प्रतिनिधींना हे पाहण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आठ राजपत्रित अधिकारी सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरळीत चालू आहेत का? अग्निशामक यंत्रणा सुस्थितीत, बंदोवस्त, लॉक आदींचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक आहे.
जामखेड श्री नागेश्वर सामाजिक सभागृह, शिर्डी-श्री साईबाबा आयटीआय कॉलेज, संगमनेर सहकार महीं भाऊसाहेब संतुजी थोरात क्रिडा संकुल, राहुरी-लोकनेते के. रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय, श्रीगोंदा- शासकीय धान्य गोडावून, पेडगाव रस्ता, शेवगाव तहसील कार्यालय, राहाता राहाता नगरपालिका प्रशासकीय इमारत, श्रीरामपूर- नवीन प्रशासकीय तहसिल कार्यालय. (Maharashtra Politics)
कोण कोण आला, कोणत्या उद्देशाने आला, याची तंतोतंत नोंद त्या वहीत केली जाते. संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दर २४ तासांत किमान एकदा स्ट्राँग रूमला भेट देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही वेळोवेळी भेटीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईव्हीएमला धोकादायक ठरू शकणार्या उंदीर, घुस, पाण्याची गळती, आग यांसारख्या धोके टाळण्यासाठी स्ट्रॉग रूम्सची खबरदारी घेण्यात आली आहे.
प्रवेशबंदी उपाययोजना
मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्व ईव्हीएम मशीन सीलबंद करण्यात आले आणि रात्रीच स्ट्रॉग रूममध्ये हलवून ठेवण्यात आले. प्रशासनाने निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्ट्रॉग रूम्सभोवती २४ तास कठोर पहारा ठेवण्यात आला आहे. पहिला स्तर हा राज्य राखीव पोलीस दलाच्या एका सेक्शनचा समावेश असून, त्यात १० अंमलदार तैनात आहेत. दुसरा स्तर जिल्हा पोलीस दलाचे आठ अंमलदार आणि त्यांच्या देखरेखीसाठी दोन अधिकारी सतत कार्यरत असणार आहेत. एकूण २० जणांचा सुरक्षा बंदोबस्त प्रत्येक स्ट्रॉग रूमला २४ तासासाठी उपलब्ध आहे. सुरक्षिततेसाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, बेरिकेटिंग आणि प्रवेशबंदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उमेदवारांच्या प्रतिनिधींना वेगळा प्रतिक्षा कक्ष देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे, स्ट्रॉग रूम परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्यासाठी नोंदवहीची व्यवस्था करण्यात आली आहे.