देशभरात इंडिगोचा सावळा गोंधळ (फोटो- सोशल मीडिया)
देशभरात इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द
अनेक राजकीय नेते, अभिनेत्यांनी व्यक्त केला संताप
विलंब आणि उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांचा रोष वाढला
इंडिगो कंपनीच्या अनेक फ्लाइट्स रद्द झाल्याने देसभरातील प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सध्या मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत आहे. गेल्या चार दिवसांपासून सतत होणाऱ्या विलंब आणि उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांचा रोष वाढला आहे. गुरुवारीच ५५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
दिल्ली विमानतळावरील प्रवाशांनी एअरलाइनवर आपला राग व्यक्त केला. एका प्रवाशाने सांगितले की, “आम्ही लग्नाला जात होतो, पण आमचे सामान गायब आहे. १२ तास उलटूनही, इंडिगो अजूनही प्रतिसाद देत नाही. हा मानसिक छळ आहे.” दुसऱ्या एका महिला प्रवाशाने सांगितले की, “१४ तास झाले आहेत आणि आम्हाला अन्न किंवा पाणी मिळालेले नाही. मी कर्मचाऱ्यांशी बोलतो तेव्हा त्यांना प्रतिसादही मिळत नाही.”
खासदार अमोल कोल्हे यांची पोस्ट काय?
देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं.
देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. 😀 ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला… pic.twitter.com/0zIbTtqdeO — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 4, 2025
३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय..! इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती… यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..! जय शिवराय.
राहुल गांधींनी सरकारला घेरले
भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने सलग तिसऱ्या दिवशी उड्डाणे रद्द करणे आणि विलंब करणे यावरून गोंधळ उडाला आहे. यामुळे राजकीय वाद देखील निर्माण झाला. सध्या संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि हे सरकारच्या “मोनोपॉली मॉडेल” आर्थिक धोरणांचे परिणाम असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एका वृत्तपत्रातील एक लेख शेअर करताना राहुल गांधी यांनी लिहिले की इंडिगोचे संकट ही या सरकारच्या मक्तेदारी मॉडेलची किंमत आहे. सामान्य भारतीय पुन्हा एकदा उड्डाण विलंब, रद्दीकरण आणि असहाय्यतेचा सामना करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात निष्पक्ष स्पर्धा हवी आहे, मॅच फिक्सिंगसारख्या मक्तेदारीचा नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
त्यांनी आरोप केला की देशातील संस्था आता सामान्य लोकांसाठी काम करत नाहीत, तर मक्तेदार गटांसाठी काम करत आहेत. लाखो छोटे व्यवसाय कोसळत आहेत आणि रोजगार निर्माण होत नाहीत. राहुल गांधी यांनी व्यावसायिकांवरही हल्ला चढवला आणि म्हटले की सरकार आणि मक्तेदारांच्या दबावामुळे त्यांना त्यांचे व्यवसाय विकावे लागत आहेत. त्यांना आयटी, सीबीआय आणि ईडीकडून छापे पडण्याची भीती वाटते.






