Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: नेवासे तालुक्यातील पुनर्वसित गावांसाठी 51 कोटीचा निधी मंजूर, आमदार विठ्ठलराव लंघे यांची माहिती

नेवासेतील २६ पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधांसाठी ५१ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 04, 2026 | 09:37 PM
नेवासे तालुक्यातील पुनर्वसित गावांसाठी 51 कोटीचा निधी मंजूर, आमदार विठ्ठलराव लंघे यांची माहिती

नेवासे तालुक्यातील पुनर्वसित गावांसाठी 51 कोटीचा निधी मंजूर, आमदार विठ्ठलराव लंघे यांची माहिती

Follow Us
Follow Us:

नेवासे तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प बाधित २६ पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधांसाठी ५१ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. नेवासे मतदारसंघातील जायकवाडी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. विशेषतः गोदावरी, प्रवरा नदीकाठच्या या गावांमध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब होती. वेळेवर संपर्क साधता न आल्याने गावकऱ्यांना मूलभूत गरजांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावांसाठी रस्त्यांची सोय होणे अत्यंत आवश्यक होते.

अधिवेशनादरम्यान आमदार विठ्ठलराव लंघे यांनी या गावांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रश्न उपस्थित केला होता. शासनाने पुनर्वसित गावांचा आराखडा तयार केला; मात्र १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पासाठी पुनर्वसन अधिनियम अस्तित्वात नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. त्यांच्या निर्देशानंतर १९७६ पूर्वीच्या गावांचाही या आराखड्यात समावेश करण्यात आला आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचा अध्यादेश काढण्यात आला.

प्रशासकीय प्रक्रिया झाली पूर्ण : आमदार लंघे

या कामांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या काही दिवसांत कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. यामध्ये पोहोच रस्ते, खडीकरण, डांबरीकरण तसेच ग्रामपंचायत कार्यालयांसारख्या नागरी सुविधांचा समावेश आहे. चरणग्रस्तांच्या प्रश्नांबावत सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून निधी मंजूर करून घेणे, पुनर्वसित गावांच्या विकासासाठी प्रयत्न करणे आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याची आमदार विठ्ठलराव लंघे यांची भूमिका कौतुकास्पद ठरत असल्याच्या प्रतिक्रिया जायकवाडी धरणग्रस्तांकडून व्यक्त होत आहेत.

पुनर्वसित गावांचा केला आराखडा

दरम्यान, नवराष्ट्र ‘शी बोलतांना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत. शासनाने पुनर्वसित गावांचा आराखडा तयार केला, मात्र १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्यासाठी पुनर्वसन अधिनियम अस्तित्वात नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री स्वगीय अजितदादा पवार यांची भेट घेऊन वस्तुस्थिती माडली होती.

धरणग्रस्तांसाठी योगदान

दरम्यान, आमदार विठ्ठलराव लंचे यांचे वडील माजी आमदार स्वर्गीय वकीलराव लंघे यांनी जायकवाडी धरणग्रस्तांसाठी मोठा लढा उभारला होता. महाराष्ट्रात पुनर्वसनाचा कायदा होण्यासाठी त्यांच्या लढ्याचे मोठे योगदान मानले जाते. गेल्या सुमारे ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धरणग्रस्ताच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा आमदार विठ्ठलराव लंघे यांनी लक्ष घालून निधी मिळवून दिल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

या पुनर्वसित गावांना मिळणार सुविधा

बहिरवाडी, फत्तेपूर, प्रवरासंगम, खलाल पिपरी, बकू पिंपळगाव, मंगळापूर, खेडले काजळी, तरवडी, उस्थळ दुमाला, भालगाव, गोधेगाव, धामोरी, गळनिव, गोपाळपूर, रामडोह खामगाव, सुरेगाव (गंगा), जैनपूर, सुरेगाव दही, खामगाव नंबर ३. वरखेड, खामगाव नंबर २. उस्थळ खालसा, बेलपांढरी, खामगाव नंबर १, बोरगाव,

Web Title: Ahilyanagar news nevasa rehabilitated villages 51 crore fund vitthalrao langhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
1

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
2

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
3

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज
4

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.