Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि पालघर जिल्हा परिषद यांच्यातील या महत्त्वपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक भागीदारी करण्यात आली आहे. याअंतर्गत शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलं जात आहे. यामुळे पालघरमधील 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 26, 2026 | 06:11 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मोतीलाल ओसवाल फाउंडेशनने पालघर जिल्हा परिषदेसोबत तीन वर्षांचा सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत ‘पालघर जिल्हा शिक्षण परिवर्तन कार्यक्रम’ सुरू करण्यात आला आहे.हा सामंजस्य करार म्हणजे जिल्हाभर राबविण्यात येणाऱ्या, शासनाच्या नेतृत्वाखालील उपक्रमाची सुरुवात आहे. ‘क्रेडल टू करिअर’ या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित आहे. बालपणापासून ते युवकांच्या रोजगारक्षमतेपर्यंत पालघरमधील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०, निपुण भारत आणि निपुण महाराष्ट्र यांच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

1 जुलैपासून काय बदलणार? लागून होणार नवे नियम, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

कार्यक्रमाचा लाभ 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना

पुढील तीन वर्षांत या कार्यक्रमाचा लाभ इयत्ता पहिली ते आठवीमधील १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ९८ हजारांहून अधिक अंगणवाडीतील बालके आणि २ हजार युवकांचाही या कार्यक्रमात समावेश असेल. पालघर जिल्ह्यातील २,११५ शासकीय शाळा, २२ खासगी अनुदानित शाळा आणि १,६३४ अंगणवाडी केंद्रांमधून हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
या उपक्रमात चार प्रमुख विषयांवर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये १) बालपणीचे शिक्षण, २) मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान, ३) भविष्यातील शिक्षण कौशल्ये आणि ४) युवकांचे कौशल्य विकास व रोजगारक्षमता यांचा समावेश आहे.

शासनाची मालकी आणि सहभाग राहणार

या उपक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीपासूनच शासनाची मालकी आणि सहभाग राहणार आहे. कार्यक्रमातील यशस्वी पद्धती, प्रशिक्षण मॉड्यूल्स आणि कार्यपद्धती जिल्हा परिषद, पालघरच्या यंत्रणेमध्ये संस्थात्मक स्वरूपात समाविष्ट केल्या जातील. त्यामुळे कार्यक्रमाची मुदत संपल्यानंतरही त्याची सातत्याने अंमलबजावणी करता येईल. त्याचा विस्तारही करता येईल. अधिक प्रभावी परिणाम साधण्यासाठी विद्यमान शासकीय योजना आणि उपलब्ध संसाधनांचा वापर करण्यात येईल.

दीर्घकालीन परिणाम साधण्यावर भर

शिक्षकांची कमतरता, देखरेखीतील सुधारणा, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी करणे अशा आव्हानांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी सर्व संबंधित घटकांना एकत्र आणणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या उद्दिष्टाला या उपक्रमातून बळ मिळणार आहे.
मोतीलाल ओसवाल फाउंडेशन या उपक्रमाचे प्रमुख समन्वयक म्हणून काम करेल. संस्थेकडून धोरणात्मक मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि कार्यक्रमाचे मार्गदर्शन दिले जाईल. प्रभावी उपक्रमांचा सार्वजनिक धोरणांमध्ये समावेश करण्यासाठी शासनाला मदत केली जाईल. पालघर जिल्हा परिषद कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि विविध विभागांमधील समन्वयाची जबाबदारी सांभाळेल. दीर्घकालीन परिणाम साधण्यावर भर दिला जाईल.

गेल्या दशकापासून सातत्यपूर्ण काम

या भागीदारीबाबत बोलताना मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ. सुनीता अग्रवाल म्हणाल्या, “आमच्या फाउंडेशनचे वाडा परिसरातील शाळांसोबत गेल्या दशकापासून सातत्यपूर्ण काम सुरू आहे. आता हा उपक्रम संपूर्ण पालघर जिल्ह्यात विस्तारण्याचा आमचा मानस आहे. शाश्वत शिक्षण व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. शिक्षण क्षेत्रात दीर्घकालीन आणि परिणामकारक उपाय विकसित करण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे हे सहकार्य प्रतीक आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शाळांसाठी अधिक चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. त्यांना अधिक सक्षम सहाय्य व्यवस्था उपलब्ध होईल.”

दीर्घकालीन परिणाम करणारं मॉडेल उभारण्यासाठी उत्सुक

पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनोज रानडे (आयएएस) म्हणाले, “पालघरमधील प्रत्येक बालक आणि युवकाचे शैक्षणिक परिणाम अधिक चांगले करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे सहकार्य प्रतीक आहे. शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील विविध घटकांच्या सामर्थ्याला या उपक्रमातून एकत्र आणले आहे. त्यामुळे बालपणापासून रोजगारक्षमतेपर्यंतच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासातील विविध आव्हानांवर समन्वित पद्धतीने काम करता येईल. जिल्हाभर मोजता येण्याजोगा आणि दीर्घकालीन परिणाम करणारे मॉडेल उभारण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

Elon Musk यांच्यानंतर ‘हा’ भारतीय व्यक्ती जगातील सर्वात महागडा CEO! दररोज कमवतो तब्बल 21 कोटी रुपये

Web Title: Motilal oswal foundation partners with palghar zp for education transformation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Business News
  • education
  • Education Department
  • Marathi News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.