Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज

अभिनेता ऋषभ साहनी याच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या आगामी 'नागाबंधम' या भव्य पॅन-इंडिया चित्रपटातील खलनायकाची भूमिका याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल आणि त्याचे शुटिंग दरम्यानचे किस्से सांगितले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 26, 2026 | 05:06 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

काही कलाकार असे असतात की त्यांच्या एका दमदार अभिनयामुळेच संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते आणि ऋषभ साहनीसाठी ‘फायटर’ हा तसाच महत्त्वाचा टप्पा ठरला. ‘अझहर अख्तर’ या भूमिकेत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठ्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर करतानाही स्वतःची वेगळी छाप उमटवली. त्यांची प्रभावी स्क्रीन उपस्थिती, सशक्त अभिनयकौशल्य आणि महत्त्वाच्या दृश्यांमध्ये स्वतःला ठामपणे सादर करण्याच्या शैलीने प्रेक्षक आणि चित्रपट निर्मात्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या अभिनयातून ते भविष्यात आणखी मोठी मजल मारू शकतात, याचे स्पष्ट संकेत मिळाले.

Vat Purnima Special: वटपौर्णिमा स्पेशलमध्ये रहस्य, रोमान्स आणि ड्रामा; ‘मी जिंकून घेईन सारं’-‘मोहिनी’चा महासंगम

आपल्या कारकिर्दीतील मोठ्या झेपेसाठी सज्ज

आता ३ जुलै रोजी पॅन-इंडिया स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या ‘नागाबंधम’मधून ऋषभ आपल्या कारकिर्दीतील आणखी एका मोठ्या झेपेसाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटात ते अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ही अशी भूमिका आहे ज्यासाठी भव्य सादरीकरण, शारीरिक क्षमता आणि भावनिक खोलीची गरज असते. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या भूमिका एखाद्या कलाकाराच्या कारकिर्दीला नवी दिशा देऊ शकतात, जर त्या प्रभावीपणे साकारल्या गेल्या तर, ऋषभ यासाठी सज्ज असल्याचं आता पाहायला मिळतं आहे.

तलवारबाजीचे प्रशिक्षण

माध्यमांतील वृत्तांनुसार, युद्धदृश्ये अधिक वास्तववादी वाटावीत यासाठी ऋषभ यानी तब्बल एका वर्षाहून अधिक काळ तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्या समर्पणाची आणि मेहनतीची ही साक्ष आहे, जी आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळते.

पश्तो भाषेसह इतिहासाचा सखोल अभ्यास

त्यांची तयारी केवळ शारीरिक बदलांपुरती मर्यादित नव्हती. असेही सांगितले जाते की त्यांनी पश्तो भाषा शिकण्याबरोबरच अहमद शाह अब्दाली यांच्या इतिहासाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास केला. त्यांचा उद्देश फक्त एका मोठ्या खलनायकाची भूमिका साकारणे नव्हता, तर त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला खऱ्या अर्थाने समजून घेणे हा होता.

पायाला दुखापत तरिही चित्रीकरण सुरुच

त्यांच्या मेहनतीचे आणखी एक मोठे उदाहरण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पाहायला मिळाले. वृत्तांनुसार, शूटिंगदरम्यान त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी चित्रपटाचे चित्रीकरण सुरूच ठेवले. यावरून या प्रकल्पाविषयीची त्यांची जिद्द आणि बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते.

‘फायटर’मधील प्रभावी सुरुवातीपासून ते ‘नागाबंधम’मध्ये इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि चर्चित व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारण्यापर्यंत, ऋषभ साहनी यांचा प्रवास एका अशा कलाकाराची कहाणी सांगतो जो कधीही सोपा मार्ग निवडण्यावर विश्वास ठेवत नाही. जर ‘फायटर’ने त्यांना एक उदयोन्मुख आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली असेल, तर ‘नागाबंधम’ त्यांना येत्या काळातील सर्वात रोमांचक आणि चर्चेत राहणाऱ्या कलाकारांच्या यादीत स्थान मिळवून देऊ शकतो.

The India Story Teaser: कीटकनाशक शेतीमागील धक्कादायक सत्य उलगडणार, ‘द इंडिया स्टोरी’चा टीझर चर्चेत

Web Title: Rishabh sawhney birthday special fighter to nagabandham movie ahmed shah abdali marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Entertainment News
  • hindi film industry
  • Hindi Movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक
1

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’
2

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड
3

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
4

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.