Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: हक्काच्या जमिनीसाठी लढा! शेतकरी संसारासह पोलिस ठाण्यात दाखल, प्रशासनाची उडाली दाणादाण

हक्काच्या जमिनीवर अजूनही सातबारावर चढत नसल्याने संतप्त झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत शेतकऱ्यांनी थेट पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 12, 2026 | 07:58 PM
शेतकरी संसारासह पोलिस ठाण्यात दाखल, प्रशासनाची उडाली दाणादाण

शेतकरी संसारासह पोलिस ठाण्यात दाखल, प्रशासनाची उडाली दाणादाण

Follow Us
Follow Us:

श्रीरामपूर न्यायालयाचा निकाल खिशात असूनही आणि मंत्रिमंडळाने मंजुरी देऊनही हक्काच्या जमिनी सातबारावर चढत नसल्याने संतप्त झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत शेतकऱ्यांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे. शनिवारी शेकडो शेतकऱ्यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यावर धडक देत जेलभरो आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे, आंदोलकांनी केवळ घोषणाबाजी न करता पोलिस ठाण्याच्या दारातच चुली मांडून मुक्काम ठोकल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

हा प्रश्न तब्बल १०७ वर्षापूर्वीचा (ब्रिटिश काळातील) आहे. तत्कालीन ब्रिटीश सरकारने महसूल थकल्याचे किंवा इतर तांत्रिक कारणे देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी ‘आकारी पडीत’ म्हणून सरकारी दप्तरी नोंदवल्या होत्या. स्वातंत्र्यानंतरही या जमिनी मूळ मालकांना किंवा त्यांच्या वारसांना परत मिळाल्या नाहीत. श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावांमधील सुमारे १२ ते १३ हजार शेतकरी यात बाधित आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली; मदत आणि उपचाराला मिळणार गती

पिढ्यानपिढ्या या जमिनी कसत असूनही तांत्रिकदृष्ट्या त्या सरकारकडे असल्याने शेतकऱ्यांना ना कर्ज मिळते, ना सरकारी योजनांचा लाभघेता येतो. शेतकरी नेते ॲड. अजित काळे यांनी या विरोधात कायदेशीर लढा दिला. ते म्हणाले, उच्च न्यायालयाने या जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या असल्याचे मान्य करून तसा निकाल दिला आहे. राज्य मंत्रिमंडळानेही दीड वर्षांपूर्वी जमिनी परत करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, मंत्रालयातील प्रशासन आणि स्थानिक महसूल विभाग या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे.

आंदोलनाचा अनोखा ‘रांधा-वाढा’ पवित्रा

महिलांच्या सहभागामुळे हे आंदोलन वेगळे ठरले. रणरणत्या उन्हात महिला आंदोलकानी पोलिस ठाण्याच्या आवारातच चुली मांडल्या. घरून आणलेली लाकडे आणि गोवऱ्या पेटवून पोलिस ठाण्याच्या दारात धूर काढला. तेथेच पीठ मळून भाकरी थापल्या आणि भाजी रांधली, जोपर्यंत शासन निर्णय (जीआर) निघत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा निर्धार महिलानी व्यक्त केला. दारातच चुली पेटल्याने पोलिस आणि तहसील प्रशासनाची गोची झाली आहे.

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा

फसवणूक झाल्यास यापुढे ‘ताबा आंदोलन’ करण्याचा दिला इशारा

आंदोलनाचे नेतृत्व करणारे ॲड. अजित काळे आक्रमक झाले. हे आमचे दुसरे आंदोलन आहे. यापूर्वी आम्ही ‘आत्मक्लेश’ आंदोलन करून स्वतःला त्रास करून घेतला, तरीही सरकारला जाग आली नाही. आता आम्ही निर्णायक भूमिकेत आहोत. यापुढे आम्ही सरकारी कार्यालयात चकरा मारणार नाही. सरकारने स्वतः येथे येऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा. यावेळीही फसवणूक झाली, तर पुढचे पाऊल ‘ताबा आंदोलन’ (कब्जा आंदोलन) असेल, शेतकरी आपल्या जमिनीचा ताबा स्वतः घेतील आणि मग निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल.

आजोबा, पणजोबांपासूनचा लढा

श्रीरामपूर तालुक्यातील ज्या नऊ गावांमधील जमिनींचा यात समावेश आहे, तेथील जनजीवन या आंदोलनामुळे प्रभावित झाले आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच आंदोलनात सामील झाले आहेत. आमच्या आजोबा-पणजोबांनी हा लढा सुरू केला होता, आता आमच्या पुढच्या पिढीचे भवितव्य तरी अंधारात राहू नये, अशी भावना आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आंदोलकांनी सोबत गायी, वासरे, शेळ्या आणि मेंढ्या आणल्या होत्या. यावेळी, जनावरांच्या हंबरड्याने पोलिस ठाणे आवार दणाणले.

Web Title: Ahilyanagar news shrirampur farmers protest land rights satbara issue maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke Update:  ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना
1

Abhijeet Dipke Update: ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!
2

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
3

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
4

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.