Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाच्या खरिप हंगामात ७९.३८ टक्के पेरणी पूर्ण झाली असून मका आणि तुरीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मात्र, अनेक भागात पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 21, 2026 | 03:27 PM
शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!

शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचा टप्पा ७९.३८ टक्क्यांवर
  • मका-तुरीची विक्रमी पेरणी
  • पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : चालू खरीप हंगामात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी हवामानाच्या लहरीपणाशी सामना करत पेरण्यांचा वेग कायम ठेवला आहे. कृषी विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ७९.३८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ७,१६,२०९ हेक्टर असून, त्यापैकी ५,६८,५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीची कामे मार्गी लागली आहेत.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दिलेली ओढ आणि उघाडीमुळे पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली असून, शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. पावसाचा हा खंड असाच लांबल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ

मका अन् तुरीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पारंपारिक पीक पद्धतीत मोठा बदल केला आहे. विशेषतः कमी दिवसांत येणाऱ्या किंवा चाऱ्याची सोय करणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

मक्याची विक्रमी १२७.६५% पेरणी

जिल्ह्यात मक्याचा पेरा सरासरीपेक्षा कितीतरी पटीने वाढला आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र ७७,९९९ हेक्टर असताना प्रत्यक्ष ९९,५६५.५७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुग्धव्यवसायासाठी लागणारा चारा आणि बाजारातील नगदी उत्पन्न यामुळे मक्याने अव्वल स्थान पटकावले आहे.

तुरीला तुफान पसंती (११५.७२%)

कडधान्यांमध्ये शेतकऱ्यांनी तुरीवर सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. सरासरीच्या तुलनेत तुरीची पेरणी ७४,७३६.२७ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. अंतरपीक आणि मुख्य पीक अशा दोन्ही स्वरूपात तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.

सोयाबीन व कापसाचे स्थान कायम

जिल्ह्याचे मुख्य नगदी पीक असलेल्या सोयाबीनची १,५५,०५५.०९ हेक्टर (८६.८६%) तर कापसाची १,३३,०६४.६५ हेक्टर (८५.६७%) क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

मूग, उडीद आणि भाताची पेरणी संथ; बाजरीही पिछाडीवर

पावसाच्या सुरुवातीच्या अनियमिततेचा फटका मुगाच्या पेरणीला बसला आहे. वेळेवर पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी मुगाकडे पाठ फिरवत मका व सोयाबीनचा पर्याय निवडला.

मुगाचे क्षेत्र घटले- मुगाची केवळ ३४.७२% तर उडदाची ५३.१८% पेरणी झाली आहे. बाजरीची स्थिती- जिल्ह्याचे पारंपरिक पीक असलेल्या बाजरीची केवळ ४६.६७% (४१,८३२.६ हेक्टर) पेरणी झाली आहे. भात लागवड- अकोले तालुक्यात प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या भात पिकाची १६.६३% (३,११६.५८ हेक्टर) पेरणी झाली आहे. तालुक्यातील १९५० हेक्टरवर रोप तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, मोठ्या पावसाच्या आगमनानंतर पुनर्लागवडीला वेग येईल. नवीन ऊस लागवड- जिल्ह्यात १८,५९४.८ हेक्टर (१३.९५%) क्षेत्रावर नवीन उसाची लागवड पूर्ण झाली आहे.

पावसाची आकडेवारी आणि हवामानाचा अंदाज- जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यातील पावसाची स्थिती अत्यंत विषाम राहिली आहे. जून महिन्यात सरासरी १०८.२ मि.मी. पावसाची गरज असताना प्रत्यक्ष केवळ ४६.८ मि.मी. (४३.६%) पाऊस पडला. जुलै महिन्यात १ ते २० जुलै दरम्यान एकूण ९७.५ मि.मी. (१००%) पावसाची नोंद झाली आहे. मात्र, हा पाऊस सर्वदूर आणि मुसळधार नसल्याने केवळ हलक्या सरींवर पेरण्या उरकण्यात आल्या. सध्या संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ हवामान असले, तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

कालावधी / महिना सरासरी पाऊस प्रत्यक्ष झालेला पाऊस टक्केवारी
जून महिना १०८.२ मि.मी. ४६.८ मि.मी. ४३.६%
१ ते २० जुलै ९७.५ मि.मी. ९७.५ मि.मी. १००%

 

पिकांची सद्यःस्थिती आणि कृषी विभागाचा दिलासा

सध्या खरिपातील मूग व उडीद पिके वाढीच्या आणि फुलोरा टप्प्यात आहेत. उर्वरित पिके उगवण व बाल्य अवस्थेत आहेत. पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ मंदावली असली, तरी शेतात सध्या कोळपणी, निंदणी आणि पूर्वमशागतीची कामे वेगाने सुरू आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा

दुबार पेरणीचे संकट नाही

जिल्ह्यात सध्यातरी कुठेही दुबार पेरणीचे संकट नाही. काही भागांत पावसाच्या अभावाने पिकांची वाढ मंदावली असली, तरी प्रत्यक्ष उगवण समाधानकारक आहे. येत्या काही दिवसांत पावसाने जोर धरल्यास उर्वरित २१% क्षेत्रावरील पेरण्याही पूर्ण होतील.”
-सुधाकर बोराळे, जिल्हा कृषी अधिकारी, अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणावर मात करत पेरण्या ७९.३८ टक्क्यांपर्यंत नेल्या आहेत. मका आणि तुरीच्या वाढत्या टक्क्यावरून शेतकरी सुरक्षित आणि नगदी पिकांकडे वळल्याचे स्पष्ट होते. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आभाळाकडे लागले असून, पिकांना नवसंजीवनी देण्यासाठी जोरदार पावसाची अत्यंत गरज आहे.

Web Title: Farmers face a double whammy record sowing of maize and tur yet the lack of rain is becoming a cause for concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • agriculture
  • Ahilyanagar
  • Farmers

संबंधित बातम्या

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती
1

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
2

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Bail Pola Festival: चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला
3

Bail Pola Festival: चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड
4

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.