Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: आदिवासींच्या डोक्यावरील हंडा उतरेना! पाण्यासाठी वणवण; प्रश्नासन तरी सुद्धा गप्प

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आदिवासी वस्तीतील लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तसेच या भागात पाणी टंचाईमुळे कुटुंब स्थलांतरित होत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 10, 2026 | 02:11 PM
आदिवासींच्या डोक्यावरील हंडा उतरेना!

आदिवासींच्या डोक्यावरील हंडा उतरेना!

Follow Us
Follow Us:

सतीश फापाळे/ घारगाव: संगमनेर तालुक्यातील पठार भागात पाणलोट क्षेत्र विकासासाठी आदर्श मानले जाणारे म्हसवंडी गाव आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. गावाने जलसंधारणाच्या कामांत उल्लेखनीय यश मिळवले असले, तरी याच गावातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवरील सुमारे दीड हजार आदिवासी नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे ‘हंडाभर पाण्यासाठीची वणवण कधी थांबणार?’ असा सवाल येथील आदिवासी समाज उपस्थित करत आहे.

म्हसवंडी गावातील वाजेवाडी, ब्राह्मणदरा आणि मळादेवी मंदिर परिसरात आदिवासी समाजाच्या वाड्या-वस्त्या असून येथे सुमारे दीड हजारांची लोकवस्ती आहे. या भागातील महिला, पुरुष आणि तरुणांना एका बाजूला उदरनिर्वाहासाठी आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांकडे मोलमजुरीसाठी जावे लागते, तर दुसऱ्या बाजूला पिण्याच्या पाण्यासाठी दररोज लांब पायपीट करावी लागत आहे.

मोठी बातमी ! महायुती सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्याच्या अडचणींत होणार वाढ; कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप

वर्षानुवर्षे आदिवासी महिला, पुरुष, लहान मुले आणि वयोवृद्धांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र येथे दिसून येते. सकाळ-संध्याकाळ हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमीटरपर्यंत चालत जावे लागते, ही परिस्थिती अत्यंत विदारक असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

निसर्ग संवर्धनाला चालना देणारे गाव

म्हसवंडी गाव जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून ओळखले जाते. येथे लोकसहभागातून आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेच्या सहकार्याने जलसंधारणाची उल्लेखनीय कामे झाली आहेत. एकता मित्रमंडळ आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून श्रमदानाच्या माध्यमातून पाणलोट विकासाची अनेक कामे करण्यात आली.

गावात चराईबंदी, कुन्हाडबंदी आणि बोरबंदी सारखे नियम पाळून निसर्ग संवर्धनालाही चालना देण्यात आली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या पर्जन्यछायेतील प्रदेशातील गावांसाठी म्हसवंडी हे एक आदर्श उदाहरण मानले जाते.

पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण

यापूर्वी ग्रामसभेत बोअरवेल बंदीचा ठराव देखील मंजूर करण्यात आला होता. मात्र आदिवासी वाड्या-वस्त्या डोंगराळ व उंच भागात असल्याने उन्हाळा सुरू होताच येथील पाण्याचे स्रोत आटू लागतात. परिणामी, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

Maharashtra Transport E-Challan: RTO कडून ‘अभय योजना’ प्रस्तावित; वेळेत दंड भरल्यास सवलतीची शक्यता

यापूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत काही कामे झाली असली तरी प्रत्यक्षात पाणी पोहोचले नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. सध्या ‘हर घर जल’ योजनेचे काम सुरू असले तरी त्याचा लाभ अद्याप आदिवासी वस्त्यांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे शासकीय योजनांपासून आदिवासी समाज वंचित राहिल्याची भावना व्यक्त होत आहे.

पाणी टंचाईमुळे स्थलांतर

ब्राह्मणदरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीला देखील पाणी पुरवठा करण्यास प्रशासन अपयशी ठरले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी देखील पाणी आणण्यासाठी मदत करताना दिसतात, त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

पाणी टंचाईमुळे येथील काही कुटुंबांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे येथे एक अंध महिला देखील पाण्यासाठी दररोज वणवण करत असल्याचे समोर आले आहे.

शासकीय योजना तर दूरच, परंतु संबंधित प्रशासनिक अधिकारी देखील या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आदिवासी समाजाने केला आहे. ग्रामसेवक, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Web Title: Ahilyanagar news tribals struggle for water mhasavadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Marathi News
  • Sangamner
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली
2

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
3

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
4

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.