
फोटो सौजन्य: Gemini
Sheetal Tejwani arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर शीतल तेजवानीला अटक
शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. तालुक्यातील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह कांदा पिकावरच अवलंबून असते. शेतकऱ्याचे वार्षिक गणितही कांदा पिकावरच आखले जाते. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी कांदा पीक महत्वाचे ठरत होते. कांदा पिकावरच शेतकरी आपली ‘सोनेरी स्वप्ने’ रंगवत असे. परंतु गेल्या काही दिवसांपासून कांद्याने अक्षरशः शेतकऱ्यांना रडवले आहे. गावरान कांदा, लाल कांदा, रांगडा कांदा लागवडीमध्ये तालुका नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. पण आता परिस्थिती बदलत आहे.
कांदा पिकाची झालेली वाईट परिस्थिती पाहता तालुक्यातील ३३३ शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. कांदा पिकाऐवजी गहू, ज्वारी, हरभरा व इतर चारा पिकांकडे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात तालुक्यात मोठी घट होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वातावरणात होणारा अचानक बदल, ढगाळ हवामान, पडणारे दव यामुळे कांदा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. महागडी औषधांची फवारणी व खतांचा वापर यामुळे खर्च वाढतो.
चापेवाडी येथील शेतकरी राजू निवृत्ती पवार यांनी सांगितले की तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांद्याची बाजारातील परिस्थिती पाहून उभ्या पिकात नांगर घातल्याचे विदारक चित्र तालुक्यात पहावयास मिळाले. बियाणे, रोप, कांदा लागवड, शेतीची मशागत, महागड्या औषधांची फवारणी, खते, खुरपणी, काढणी यासाठी मोठा खर्च येतो. परंतु उत्पन्नाची शाश्वती नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्याऱ्यांनी कांद्याच्या उभ्या पिकात नांगर घातला आहे. पाच एकर उभ्या कांद्यामध्ये नांगर फिरवून गहू व चारा पिकांची पेरणी केली आहे.