वडगाव मावळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानानंतर ईव्हीएम मशीन स्ट्रॉगरुममध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले (फोटो - टीम नवराष्ट्र)
मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली. सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसत होत्या. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घेतला. अखेर संपूर्ण दिवसभर झालेल्या मतदानानंतर 73 टक्के मतदान नोंदवण्यात आले.
मतदानानंतर ईव्हीएम सुरक्षित स्ट्रॉंगरूममध्ये
मतदान संपल्यानंतर सर्व २४ ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट युनिट्स सुरक्षितपणे सीलबंद करून नगरपंचायतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्ट्रॉंगरूममध्ये हलवण्यात आली. मशीन हलवण्याची संपूर्ण प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ रेकॉर्डिंगसह करण्यात आली.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या घरी लगीनगाई! परदेशात पार पडणार विवाहसोहळा, राष्ट्रवादीच्या केवळ दोन नेत्यांनाच आमंत्रण
स्ट्रॉगरूम प्रवेशासाठी कठोर बंदोबस्त तैनात
पहिला सुरक्षा स्तर: नगरपंचायतीच्या परिघात कडक तपासणी, येणाऱ्यांची नोंद दुसरा सुरक्षा स्तर: स्ट्रॉंगरूमच्या अगदी बाहेर एसआरपीएफ व स्थानिक पोलीस तैनात या सुरक्षा व्यवस्थेत एसआरपीएफचे ७ जवान स्थानिक पोलिसांचे सुमारे १० कर्मचारी
अखंडित २४ तास ड्युटीवर आहेत.
सीसीटीव्ही चौकशी आणि लोखंडी गेट
स्ट्रॉंगरूमला लोखंडी गेट, मजबूत टाळे तसेच उच्च क्षमतेच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांची जाळी बसवण्यात आली आहे. संपूर्ण परिसराचा व्हिडिओ रेकॉर्ड थेट नियंत्रण कक्षात पाहता येतो. कॅमेऱ्यांमध्ये स्ट्रॉंगरूमच्या आत, बाहेर, कॉरिडॉर आणि प्रवेशद्वारांचा प्रत्येक भाग स्पष्ट दिसतो. स्ट्रॉंगरूम परिसर हा पूर्णपणे नो-एंट्री झोन घोषित करण्यात आला असून उमेदवार, कार्यकर्ते किंवा सामान्य नागरिकांना तेथे प्रवेश दिला जात नाही. आवश्यकतेनुसार केवळ निवडणूक आयोगाचे अधिकारीच परवानगीसह प्रवेश करू शकतात.
हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मतमोजणी 21 डिसेंबरला
नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यापर्यंत सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंगरूममध्येच सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखाली राहणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी सुध्दा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यावेळी स्ट्रॉंगरूम उघडण्याची प्रक्रिया देखील प्रत्येक टप्प्यावर व्हिडिओ रेकॉर्डिंगसह पार पडणार आहे.






