Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: अहिल्यानगर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा! ‘या’ पोहोचतंय टँकरद्वारे पाणी

अहिल्यानगर तालुक्यात ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या पाहायला मिळत आहे. तालुक्यातील अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 26, 2026 | 08:30 PM
Ahilyanagar News: अहिल्यानगर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा! ‘या’ पोहोचतंय टँकरद्वारे पाणी
Follow Us
Follow Us:

नगर तालुक्यातील बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर गावांची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. डोंगर उतारावरील विविध गावांमधील विहिरी, कूपनलिका कोरड्याठाक पडल्या असून सर्वच जलस्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.

भोयरे पठार गावचा टँकरसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील विविध गावे गर्भगिरीच्या डोंगर उतारावर वसलेली आहेत. अशा गावांमध्ये पावसाच्या सुरुवातीलाच भूजल पातळी वाढते तर उन्हाळ्याच्या

सुरुवातीलाच भूजल पातळी झपाट्याने खालावून पाणीटंचाई जाणवू लागते. इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी या गावांसह ठराविक गावांना दरवर्षीच उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहावे लागते. या तीन गावांना १० एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. भोयरे पठार गावचा पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाला आहे.

Ahilyanagar News: साकळाई योजनेला वादाचे ग्रहण! घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी उतरले रस्त्यावर

गावोगावी प्रभावी योजना राबविणे आवश्यक

यंदा तालुक्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता. सर्व नद्या-नाल्यांना महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील सर्वच तलाव, नाले, बंधारे तुडुंब भरले होते. तरीदेखील पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात टँकर सुरू करावे लागले आहेत.

जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. अनेक नद्या, ओढ्यांवर बंधारे बांधण्यात आले आहेत. तालुका टँकरमुक्त करण्यासाठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा मोहीम गावोगावी सक्रियपणे राबवण्याची गरज आहे, भौगोलिक संरचनेनुसार डोंगर उतारावर वसलेल्या गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत्तात है वास्तव आहे. अशा गावांमध्ये पशुधनाच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. जेऊर परिसरातील वाड्यावस्त्यांवरही पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली असून येथेही लवकरच टँकर सुरू करावे लागतील, अशी परिस्थिती आहे.

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद! ४५५ दात्यांचा सहभाग संत निरंकारी मिशनतर्फे सामाजिक बांधिलकीचे दर्शन

आणखी काही गावांचे टँकरसाठी प्रस्ताव दाखल होण्याची चिन्हे आहेत. गावात नद्यांचे तसेच ओढ्यांचे खोलीकरण करणे, तलावातील गाळ उपसा, तलाव, बंधारे दुरुस्ती करून गळती बंद करणे, वृक्ष लागवड करणे, पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे, पाण्याचा वापर जपून करणे अशा योजना गावोगावी प्रभावीपणे राबविल्या गेल्यास तालुका टैंकर मुक्त होण्यास निश्चितपणे मदत होईल.

Web Title: Ahilyanagar water crisis tanker supply villages groundwater shortage maharashtra news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण
1

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

Gandhi Jayanti In Shevgaon : शेगावात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान; ‘नमो सेवा गाथा’तून शासकीय योजनांचा जागर
2

Gandhi Jayanti In Shevgaon : शेगावात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान; ‘नमो सेवा गाथा’तून शासकीय योजनांचा जागर

Water Crisis : बार्डी गावात पाणीटंचाईचा उद्रेक; महिलांचा पंचायत समितीवर मोर्चा,ग्रामस्थांचा संताप
3

Water Crisis : बार्डी गावात पाणीटंचाईचा उद्रेक; महिलांचा पंचायत समितीवर मोर्चा,ग्रामस्थांचा संताप

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
4

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.