Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अल निनो’मुळे संभाजीनगरवर पाणीटंचाईचं संकट! गावात दवंडी देण्याचे आदेश; जिल्हा प्रशासनाचा मोठा प्लॅन सज्ज

अल निनोच्या प्रभावामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण झाली असून, झेडपी सीईओ मिन्नू पी. एम. आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ग्रामीण भागासाठी कडक जल नियोजन नियमावली जाहीर केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 21, 2026 | 02:03 PM
‘अल निनो’मुळे संभाजीनगरवर पाणीटंचाईचं संकट! गावात दवंडी देण्याचे आदेश; जिल्हा प्रशासनाचा मोठा प्लॅन सज्ज
Follow Us
Follow Us:
  • ‘अल निनो’मुळे संभाजीनगरवर पाणीटंचाईचं संकट!
  • गावात दवंडी देण्याचे आदेश
  • जिल्हा प्रशासनाचा मोठा प्लॅन सज्ज
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): यंदा सर्वत्र ‘अल निनों’च्या प्रभावामुळे पर्जन्यमानावर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. परिणामी पावसाची कमी हजेरी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी. एम. यांनी केले आहे. संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी महसूल, पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणी पुरवठा व इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवणे गरजेचे आहे. जिल्ह्यात प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. यासाठी गावातील नागरिकांना दवंडी देऊन ‘पाणी आहे तितकेच वापरा, पाणी वाचवा’ या संदेशाद्वारे जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हा परिषद सीईओ मिन्नु यांनी यंत्रणेला केल्या आहेत. याद्वारे पिण्याच्या पाण्याचा योग्य वापर आणि बचत करणे शक्य होईल. संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सीईओ यांनी संबंधित यंत्रणेला सूचना केल्या आहेत.

राज्याचे मुख्य सचिव व संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनीदेखील याबाबत जनतेला आवाहन केले आहे. राज्यात सध्या अल निनो प्रभावामुळे मान्सूनला विलंब होत आहे. त्यामुळे गावांमध्ये संभाव्य गंभीर पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हयातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीनी राज्य व जिल्हा स्तरावरून प्राप्त मार्गदर्शक सूचनांची अत्यंत काटेकोरपणे व तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याबाबत सीईओ मिन्नु यानी, यंत्रणेला आवश्यक सूचना केल्या आहेत.

गावात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी व जनजागृती मोहीम राबवावी, ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध जलस्रोत, साठा व पाणी पुरवठा स्थितीचे नियमित शुद्धीकरण करावे, पाणी पुरवठा योजना, विहिरी, बोअरवेल व इतर जलसोत कार्यान्वित स्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी, गावातील शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये व इतर सार्वजनिक संस्थांमध्ये पाणी बचतीबाबत विशेष सूचना देऊन त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याबाबतही सीईओ यांनी सूचित केले आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्यास त्याच्या नियमित नोंदी ठेवाव्यात, अशा सूचना सीईओ यांनी दिल्या आहेत.

संभाजीनगर मनपाची शहरभर धडक कारवाई! ७३ मालमत्तांची झाडाझडती, १७ सील; एकाच दिवसात ९२.७० लाखांची कर वसुली

पाण्याचा अपव्यय टाळावा

पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुणे, बागांना पाणी देणे इत्यादी गैर-प्राधान्य कामांसाठी टाळण्याबाबत सूचना द्याव्यात, पाणी पुरवठा योजनांची गळती. अनधिकृत नळजोडणी व पाण्याची चोरी रोखण्यासाठी मोहीम राबवावी, पाणी योजनांच्या वीज बिलांची पूर्तता वेळेत करून योजना अखंडित सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सीईओंनी केले आहे.

अहवाल सादर करा

टंचाईची शक्यता असलेल्या गावांमध्ये पर्यायी विहिरी, बोअरवेल, अधिग्रहण आदी जलस्रोत उपलब्धतेची पूर्वतयारी करावी, जलसंधारण, पावसाचे पाणी साठवणूक क भूजल पुनर्भरणाबाबत ग्रामस्तरावर जनजागृती करण्यात यावी, पाणी गुणवत्तेची नियमिता तपासणी करून नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, पाणी टंचाईसंदर्भातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून समन्वय ठेवण्यात यावा, पिण्याच्या पाण्याच्या सोतांमधील उपलब्ध साठा ३० दिवसांपेक्षा कमी असल्यास त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा, अशी सूचना दिली आहे.

गणपतीपुळे समुद्रात पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे 5 जण बुडाले, पर्यटनाचा आनंद क्षणात विरला

Web Title: Water scarcity crisis looms over sambhajinagar due to el nio orders issued for public announcements in villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.