Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीची कसरत आणि योगाची जिद्द! सॉफ्टवेअर इंजिनिअर सीमा पवार यांचे जागतिक व्यासपीठावर दैदिप्यमान यश

नोकरी आणि आवड सांभाळण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण नेहमी नोकरीची निवड करतोय. आपली आवड मागे पडत जाते. पण नोकरीचे कडक वेळापत्रक सांभाळत, योग साधनेच्या बळावर जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर सीमा पवार या सगळ्यांसाठी आदर्श ठरत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 21, 2026 | 05:13 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर/ पोपट पिटेकर :  जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. पण जेव्हा याच योगासनाच्या बळावर एखादी मराठी कन्या जागतिक पातळीवर देशाचा तिरंगा अभिमानाने उंचवते, तेव्हा तो आनंद द्विगुणित होतो. महाराष्ट्राच्या क्रीडा जगताला आणि विशेषतः ग्रामीण भागाला एक नवा आत्मविश्वास देणारी अशीच एक सुवर्णलखा लिहिली गेली आहे. जामखेड तालुक्यातील ‘बावी’ गावच्या कन्या सीमा सुधीर पवार यांनी पहिल्या जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत (World Yogasana Sports Championship 2026) मिळवलेले रौप्यपदक केवळ एक पदक नसून, ती एका खडतर आणि जिद्दी प्रवासाची यशोगाथा आहे.

Navi Mumbai विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा श्रीगणेशा! Air India एक्सप्रेसकडून नवी मुंबई -अबू धाबीदरम्यान थेट विमानसेवा

कठोर परिश्रम आणि प्रवास

ग्रामीण भागातून जागतिक व्यासपीठापर्यंतचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात असलेल्या ‘बावी’ या छोट्याशा गावातून सीमा पवार यांचा प्रवास सुरू झाला. ग्रामीण भागात आजही क्रीडा सुविधांची वानवा असताना, केवळ स्वतःची जिद्द, कठोर परिश्रम आणि सतत काहीतरी वेगळे करण्याची इच्छा याच्या जोरावर सीमा यांनी योगासनाचा सराव सुरू ठेवला. जिल्हा पातळीवरून सुरू झालेला हा प्रवास राज्य, राष्ट्र आणि आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचला आहे.

कठीण संघर्षातून ध्येयाकडे

१ व २ मे २०२६ रोजी हरियाणातील सोनीपत येथे झालेल्या अत्यंत कठीण अशा राष्ट्रीय निवड चाचणीत त्यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आणि भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले.अहमदाबाद, गुजरात येथे ४ ते ८ जून २०२६ दरम्यान पार पडलेल्या या ऐतिहासिक जागतिक स्पर्धेत तब्बल ७६ देशांतील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या अत्यंत चुरशीच्या वातावरणात, सीमा पवार यांनी ‘Senior A Women’ गटातील ‘Twisting Body’ या अत्यंत अवघड प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले. १५ हून अधिक देशांच्या तगड्या स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी उपविजेतेपद म्हणजेच रौप्यपदक पटकावले आणि भारतासह आपल्या जन्मभूमीचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले.

सर्वांसमोर एक आदर्श

‘कॉर्पोरेट लाईफ’ आणि ‘योग साधना’ यांचा सुवर्णमध्यआजच्या धावपळीच्या युगात तरुणाईसमोर सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे ‘वर्क-लाइफ बॅलन्स’साधणे. अनेकांना नोकरीच्या ताणतणावामुळे स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणे कठीण होते. अशा काळात सीमा पवार यांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. सीमा या सध्या पुणे येथील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहेत.आयटी क्षेत्रातील नोकरी म्हणजे डोक्यावर सतत असणारे प्रोजेक्ट्सचे डेडलाईन्स, स्क्रीनसमोर घालवावे लागणारे तासनतास आणि मानसिक थकवा. अशा आव्हानात्मक क्षेत्रात वरिष्ठ पदावर काम करत असतानाही, त्यांनी आपल्या योगासनाच्या सरावात कधीही खंड पडू दिला नाही. दिवसातील काही तास ऑफिसच्या कामासाठी दिल्यानंतर, उरलेला वेळ त्यांनी योगाच्या खडतर साधनेसाठी दिला. कॉर्पोरेट क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळून जागतिक स्तरावरील पदकावर नाव कोरणे, ही खरंच थक्क करणारी ‘कसरत’ आहे.

सातत्य आणि कष्टाचे फळसीमा पवार यांचे हे जागतिक यश एका रात्रीत मिळालेले नाही, तर त्यामागे वर्षानुवर्षांचे सातत्य आहे. त्यांच्या यशाचा आलेख पाहिला तर त्यांच्यातील खेळाडूची प्रगती दिसून येते

स्पर्धा पातळीवर मिळालेले यश

जिल्हास्तरीय स्पर्धासुवर्णपदक, राज्यस्तरीय स्पर्धासुवर्णपदक, राष्ट्रीय स्पर्धारौप्यपदक, जागतिक स्पर्धा (World Championship 2026)रौप्यपदक सारख्या स्पर्धांमध्ये नाविण्यपूर्ण कामगिरी करत यश संपादन केलं.

तरुण पिढीसाठी एक दीपस्तंभ

“शिक्षण, नोकरी आणि क्रीडा यांचा योग्य समतोल कसा साधावा, याचे उत्तम उदाहरण सीमा यांनी समाजासमोर ठेवले आहे.”आजची तरुणाई अनेकदा वेळेचे कारण पुढे करून आपल्या आवडीनिवडी किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष करते. सीमा पवार यांचे यश अशा प्रत्येकासाठी एक चपराक आणि सोबतच मोठी प्रेरणा आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे की, जर तुमच्या मनात जिद्द असेल आणि प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. एकाच वेळी उत्तम शिक्षण घेणे, आयटी क्षेत्रात उच्च पदावर काम करणे आणि योगासनात जगामध्ये देशाचे नाव रोशन करणे हे केवळ अफाट इच्छाशक्तीच्या जोरावरच शक्य आहे.

देशभरातून कौतुकाचा वर्षाव

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या सुवर्णक्षणी, सीमा पवार यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे कुटुंबीय, त्यांचे प्रशिक्षक, बावी गावचे ग्रामस्थ आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलींनी जर ठरवले, तर त्या जागतिक पटलावरही देशाचा झेंडा रोवू शकतात, हे सीमा यांनी दाखवून दिले आहे.भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या या ‘योगकन्येला’ नवभारत, नवराष्ट्र परिवाराकडून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सलाम आणि पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा!

ज्यासाठी Ambani-Adani अब्जावधी गुंतवताहेत, चीनने समुद्राखाली उभारत रचला इतिहास! भारतासाठीही मोठी संधी?

Web Title: Software engineer seema pawar international yoga achievement ahilyanagar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • international yoga day
  • Marathi News
  • special story
  • success tips
  • yoga

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.