Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: पोहण्यास गेलेला युवक दोन दिवसांनंतरही बेपत्ताच, संतप्त नातेवाईक महिलांच्या पाण्यात उड्या

श्रीगोंदे येथे पोहण्यास गेलेला तरुण दोन दिवसानंतर सुद्धा बेपत्ता होता. तरुणाच्या शोधकार्यात प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने संतप्त नातेवाईक महिलांनी पाण्यात उड्या मारल्या.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 16, 2026 | 09:32 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

श्रीगोंदे येथे पोहण्यासाठी गेलेला तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने आणि त्याच्या शोधकार्यासाठी प्रशासनाकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या निषेधार्थ बेपत्ता तरुणाच्या नातेवाईक महिलांनी कालव्यात उड्या घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र पोलिस आणि प्रशासन खडबडून जागे झाले.

पिंपळगाव पिसा येथील हंगा जलसेतू कुकडी कालव्यात पोहण्यासाठी गेलेला गणेश जाधव हा तरुण दोन दिवस उलटल्यानंतरही बेपत्ता आहे. त्याचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. ग्रामस्थांनी सांगितले की, या घटनेबाबत आमदार आणि खासदारांशी संपर्क साधूनही प्रशासनाकडून अपेक्षित मदत मिळाली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, ग्रामस्थांनी स्वतःच बोट आणून कालव्यात उतरून तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कालवा भरून वाहत असल्याने आणि पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू असल्यामुळे शोधकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.

महिलांच्या उड्यांनंतर प्रशासनाला जाग

कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालव्याचे पाणी बंद करण्यास असमर्थता दर्शवल्याने संतप्त झालेल्या बेपत्ता तरुणाच्या नातेवाईक महिलांनी वैतागून कालव्यात उड्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित बेलवंडी पोलिस आणि ग्रामस्थांनी तत्परता दाखवत या महिलांना पाण्यातून बाहेर काढले.

या घटनेनंतर कुकडी पाटबंधारे विभागाने परिस्थितीची गंभीर दखल घेत अखेर कालव्याचे पाणी विसापूर धरणाकडे वळवले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात कमी झाला असून आता बेपत्ता तरुणाचा शोध घेणे सोपे होणार असल्याचे सांगितले जात आहे.

शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, संगमनेर तालुक्यातील बोराटे वस्ती परिसरात शेततळ्यात पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव पाराजी धोंडीबा देवगिरे (वय ५०) असे असून ते साकूर येथील देवगिरे वस्तीवर वास्तव्यास होते. बोराटे वस्ती परिसरात त्यांची शेती असून त्यांनी अलीकडेच शेतीसाठी शेततळे तयार केले होते.

रविवारी सकाळी ते कामानिमित्त शेततळ्याकडे गेले असताना पाय घसरून ते पाण्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. शेततळ्यावर पाहणी केली असता त्यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला.

त्यांना तातडीने साकूर येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गांधले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पाराजी देवगिरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे साकूर परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Ahilyanagar youth missing for two days relatives jump into canal in protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • Sangamner

संबंधित बातम्या

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार
1

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
2

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
3

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
4

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.