Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tourism News: “राज्यातील ५० पर्यटन स्थळांचा विकास…”; विधान परिषदेत आशिष जयस्वाल यांची माहिती

उजनी धरण परिसरात पर्यटन विकास करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उजनी धरण परिसराचा पर्यटन विकास प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 19, 2026 | 11:34 AM
Tourism News: "राज्यातील ५० पर्यटन स्थळांचा विकास..."; विधान परिषदेत आशिष जयस्वाल यांची माहिती

Tourism News: "राज्यातील ५० पर्यटन स्थळांचा विकास..."; विधान परिषदेत आशिष जयस्वाल यांची माहिती

Follow Us
Follow Us:

राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देण्यात येणार
राज्यातील ५० पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार
प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार

मुंबई: राज्यात पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक स्थळे आहेत. या साधन संपत्तीचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून योग्य उपयोग करून राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देण्यात येणार असून विकसित महाराष्ट्र २०४७ चा संकल्प लक्षात घेऊन प्रादेशिक पर्यटन योजनेतून राज्यातील ५० पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे.

या योजनेतून प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार असल्याची माहिती वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत दिली. नियम ९२ अन्वये विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उजनी धरण परिसराचा पर्यटन विकास या विषयी अर्धा तास चर्चा उपस्थित केली.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, महाराष्ट्रराज्यात मोठ्या प्रमाणावर जलस्रोत, विस्तीर्ण समुद्रकिनारा, ऐतिहासिक गड-किल्ले आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तसेच अनेक जागतिक वारसा स्थळे, धार्मिक पर्यटन स्थळे राज्यात आहेत. पर्यटन विकासासाठी जलक्रीडा, वन पर्यटन, वारसा स्थळे आणि धार्मिक पर्यटन हे चार महत्चाचे स्तंभ आहेत. या पर्यटन स्थळांच्या माध्यमातून राज्यात पर्यटकांची संख्या वाढावी आणि पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणे यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.

Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

उजनी धरण परिसरात पर्यटन विकास करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उजनी धरण परिसराचा पर्यटन विकास प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. उजनी धरण प्रकल्पावर पर्यटनाच्या कामासाठी जलसंपदा विभागाची नाहरकत आवश्यक असल्याचे सांगत राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, जलसंपदा विभाग, पर्यटन विभाग आणि इतर संबंधित विभागांनी समन्वयाने निर्णय घेतल्यास राज्यातील जलस्रोतांचा पर्यटनासाठी प्रभावी वापर करता येईल. सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणाचा वापर करून पर्यटन प्रकल्पांना गती देण्यात येईल. उजनी धरण प्रकल्पास भेट देऊन या प्रकल्पावर करण्यात येणाऱ्या पर्यटन प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.

सुरक्षेच्या बाबतीत इथे आहे मोठा धोका

अफगाणिस्तान – तालिबानच्या नियंत्रणाखाली देशातील नागरिक स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात मर्यादित झाले आहे. दहशतवादी हल्ले, अचानक हिंसाचार आणि परदेशी नागरिकांच्या अपहरणाचा धोका कायम आहे.

या वर्षी चुकूनही बनवू नका हे देश फिरण्याचा प्लॅन… सुरक्षेच्या बाबतीत इथे आहे मोठा धोका

सूडान – सैन्य आणि अर्धसैनिक गटांमधील भीषण संघर्षामुळे देशातील परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. मूलभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या असून कायदा-सुव्यवस्था जवळपास अस्तित्वात नाही.

यमन – अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे आणि मानवी संकटामुळे यमन हा जगातील सर्वात असुरक्षित देशांपैकी एक ठरला आहे. हूती बंडखोरांच्या हालचाली आणि प्रादेशिक तणावामुळे विमानसेवाही धोक्यात आहे.

Web Title: Ahish jaiswal 50 tourist destinations in maharashtra will developed through regional tourism plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • Ashish Jaiswal
  • economy
  • Maharashtra Tourism

संबंधित बातम्या

Lohagad Fort : वीकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन? निसर्ग आणि इतिहासाचा संगम असलेल्या लोहगड किल्ल्याला द्या भेट; ट्रिपसाठी ठरेल बेस्ट स्पॉट
1

Lohagad Fort : वीकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन? निसर्ग आणि इतिहासाचा संगम असलेल्या लोहगड किल्ल्याला द्या भेट; ट्रिपसाठी ठरेल बेस्ट स्पॉट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.