Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; युवक प्रदेशाध्यक्षपदी अजित पाटील यांची निवड

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारणी अधिकृत जाहीर केली असून, जतचे अजित पाटील यांची पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 11, 2026 | 11:36 AM
राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; युवक प्रदेशाध्यक्षपदी अजित पाटील यांची निवड

राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; युवक प्रदेशाध्यक्षपदी अजित पाटील यांची निवड

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर
  • युवक प्रदेशाध्यक्षपदी अजित पाटील यांची निवड
  • रामचंद्र मदने व अकील नगारजी यांची प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी वर्णी
जत : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारणी अधिकृत जाहीर केली असून, जतचे अजित पाटील यांची पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी तर रामचंद्र मदने व अकील नगारजी यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी वर्णी लागली आहे.

 

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी दशेपासून अजित पाटील हे सक्रिय राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करत आहेत. वडिलांच्या जागेवरती पोलीस दलामध्ये अनुकंप तत्वावरील नोकरी सोडून त्यांनी जानकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला. त्या दिवसापासून त्यांनी एक पक्ष, एक झेंडा व एक नेता आयुष्यामध्ये आजपर्यंत समर्पित जीवनशैली अवलंबली आहे. गेल्या वीस वर्षापासून काम करत असणाऱ्या अजित पाटील यांच्यासारख्या जत तालुक्यातील दुष्काळी भागातील युवकांला महादेव जानकर यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.

अजित पाटील यांची ओळख एक आक्रमक अभ्यासू युवक नेतृत्व तसेच राष्ट्रीय समाज पक्षाची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाते. निश्चित जत तालुक्याला त्यांच्या माध्यमातून एखाद्या राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद हे प्रथमच मिळाले आहे. तसेच जत तालुक्यातील कंठी गावचे सुपुत्र सर्वोदय पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रामचंद्र मदने व अकिल नगरजी यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश कार्यकारणीत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने संघटनात्मक बांधणीवर जोर दिला असून, जत तालुक्यामध्ये संघटन मजबूत होण्याकरिता येणाऱ्या काळात बांधणी जोमाने करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.

निवडीनंतर अजित पाटील म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर, राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धाप्पा अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव बाळाकृष्ण लेंगरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सरगर यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी मी नक्कीच सार्थ ठरवेन. पक्षात युवकांचे संघटन अधिक मजबूत करून, नवीन युवकांना सर्व घटकांसह जोडत एक सक्षम आणि एकजूट युवकांची फळी उभी करू, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार!

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवर मध्यरात्री ‘दरोडा’; मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर आरोप

Web Title: Ajit patil has been elected as the youth state president of the rashtriya samaj party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Mahadev Jankar
  • maharashtra
  • RSP

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.